◾ वैभववाडी पंचायत समिती येथे डेमो हाऊसचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन..
🖥 Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी, दि- १९:- प्रधानमंत्री आवास योजनेतून वैभववाडी तालुक्यात घरे बांधण्यात येणार आहेत. संबंधित लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या घरकुला संदर्भातील माहिती अधिक सुलभ व्हावी. यासाठी वैभववाडी पंचायत समिती कार्यालयासमोर घरकुलाची उत्तम नमुना प्रतिकृती (डेमो हाऊस) उभारण्यात येत आहे. या डेमो हाऊसचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. तालुक्यात मंजूर असलेल्या ब यादीतील घरकुले जवळपास बांधून पूर्ण झाली आहेत. ड यादीतील घरकुले एप्रिल महिन्यापासून बांधण्यात येणार आहेत. संबंधित लाभार्थ्यांना सदर घरकुलात कोणकोणत्या सोयी असाव्यात. ते घरकुल कसे असावे. याबाबत माहिती या डेमो हाऊस मधून दिली जाणार आहे
यावेळी मंडळ अध्यक्ष नासीर काझी, माजी वीत्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, पं. स. उपसभापती अरविंद रावराणे, उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, सहाय्यक गटविकास अधिकारी शुभदा पाटील, गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, माजी सभापती स्नेहलता चोरगे, सीमा नानिवडेकर, भारती रावराणे, हर्षदा हरयाण, शुभांगी पवार, बंड्या मांजरेकर, राजेंद्र राणे, राजू पवार, बाळा हरयाण, किशोर दळवी, संजय सावंत, विश्राम राणे, उदय पांचाळ, प्रदीप नारकर, गजानन पाटील, स्वप्निल खानविलकर, संताजी रावराणे, रत्नाकर कदम, सुनील भोगले व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

