कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾ इन्सुली येथील कालव्याचे अपूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण करा; सामाजिक कार्यकर्ते तसेच शेतकऱ्यांमार्फत ग्रामपंचायतीला निवेदन

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : अंकुश नाईक

 🎴बांदा,दि-१८:-  इन्सुली गावातील शेतकऱ्यांनी १५ वर्षांपुर्वी गावातुन कालवा जाण्यासाठी अगदी कमी दराने पाटबंधारे विभागाला दिल्या, परंतु अद्यापही कालव्याचे काम इन्सुलीत रखडलेल्या स्थितीत आहे.तिलारी बांदा शाखा अंतर्गत कालवा हा नेतर्डे-गाळेल-बांदा-वाफोली-विलवडे-सरंबळे-ओटवणे अशा मार्गाने इन्सुली गावात येतो,मागच्या काही महिन्यात ओटवणे पर्यंत या कालव्याला पाणी सोडले जात आहे परंतु इन्सुली गावात कालव्याचे काम अपूर्ण असल्याने पाणी येत नाही.एवढी वर्षे होऊनही हे काम अपूर्ण का असा‌‌ सवाल करत इन्सुली गावातील शेतकरी तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभागाला याची जाग यावी यासाठी इन्सुली ग्रामपंचायतीने पण या कामाकडे लक्ष देऊन त्यांना जाग करून द्यावी यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते नितीन राऊळ,शेतकरी समीर ‌सावंत,अभय पालव,दामोदर डुगल आहे आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!