राज्याला मिळालेल्या ५३ लाख लसींपैकी फक्त २३ लाख लसीकरण झाले असून, उर्वरित ३० लाख लसीकरण केव्हा करणार?
🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. १८ एकीकडे महाराष्ट्रात कोव्हीड लसीचा तुटवडा आहे, असे पंतप्रधानांकडे रडगाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गायले. राज्याला मिळालेल्या ५३ लाख लसींपैकी फक्त २३ लाख लसीकरण झाले असून, उर्वरित ३० लाख लसीकरण केव्हा करणार?
सिंधुदुर्गात उपलब्ध ४० हजार कोव्हीड लसींपैकी फक्त १४ हजार लसीकरण झाले आहे. संसदेत शिवसनेचा गटनेता असलेल्या खासदार राऊत आपल्या जिल्ह्यात शिल्लक २६ हजार लसीकरण करण्याचे काय नियोजन करणार आहेत? पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आरोग्य विभाग याचे काय उत्तर देणार? असा सडेतोड सवाल आमदार नितेश राणेंनी केला.
महाराष्ट्रात कोव्हीड लसीचा तुटवडा असल्याच्या मुख्यमंत्री ठाकरे यांच्या दाव्याचा आमदार नितेश राणेंनी चांगलीच चिरफाड केली. आधी शिल्लक राहिलेल्या ३० लाख लसीकरणाचे काय ते नियोजन करा.
सिंधुदुर्गात शिल्लक २६ हजार कोव्हिड लसीकरण कधी करणार? असा सवालही राणेंनी केला. उद्या होळी सणासाठी चाकरमानी आल्यानंतर कोरोना प्रादुर्भाव वाढल्यास राज्यातील सत्ताधारी केंद्रावर ठेवणार. पण दिलेल्या लसी कधी वापरात आणणार याचे नियोजनशून्य कारभार असल्याची टीका आमदार नितेश यांनी केली.
यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे आदी उपस्थित होते.
💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत.🔥
💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥
🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥
🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️
♦संपादक : सीताराम गावडे
📱संपर्क : +919423304856
♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड
📱संपर्क : +919423958828
♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे
📱संपर्क : +919405475712
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला