मुदतवाढ ठरावावर नगराध्यक्षा सही करीत नसल्याने ३७ कामे रखडणार…
◼️चिपळूण पालिकेतील महाविकास आघाडीचा आरोप
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण : दि. १८ नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ३७ विकासकामांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर झाला असूनही नगराध्यक्षा सौ . सुरेखा खेराडे या त्या मुदत वाढीच्या ठरावावर सही करीत नाहीत . त्यामुळे शहरातील कोणतीही तक्रार नसणारी विकास कामे रखडणार आहेत . छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळा , मुरादपूर रस्ता , राधाकृष्ण नगरमधील रस्ते , बापट आळी , सोनार आळी या परिसरातील रस्ते आदी कामे वेळेत पूर्ण होणार नाहीत . यामुळे नागरिकांना फार त्रास होणार असून नगराध्यक्षा जाणीवपूर्वक सही करीत नसल्याचा थेट आरोप महाविकास आघाडीच्यावतीने उपनगराध्यक्षा सुधीरशेठ शिंदे , आरोग्य सभापती शशिकांत मोदी यांनी केला . मागासवर्गीय सभापती उमेश सकपाळ यांच्या दालनात बुधवारी ( दि .१७ ) महाविकास आघाडीच्यावतीने – पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्षांच्या – आडमुठ्या धोरणावर टीका करण्यात – आली . या वेळी श्री . मोदी म्हणाले – शहराच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या नगराध्यक्षांनी जी चांगली कामे केली त्याचे आम्ही कौतुक केले आहे . आमचीही लहानमोठी कामे – त्यांच्यामुळे मार्गी लागली ते आम्ही कधीही नाकारले नाही पण गेले वर्षभर कोरोना व इतर तांत्रिक अडचणीमुळे जी कामे नाहक रखडली आहेत , ती मार्गी लागावी हीच आमची इच्छा आहे . नगरसेवक कबिर काद्री यांनी चुकीच्या कामाला आम्ही मंजुरी देत नाही म्हणून योग्य कामाच्या ठरावावर नगराध्यक्षा सही करीत नाहीत , असा आरोप केला . या वेळी उपनगराध्यक्ष सुधीरशेठ शिंदे , ओराग्य सभापती शशिकांत मोदी , बांधकाम सभापती मनोज शिंदे ,स्त्रिया व बालकल्याण सभापती सुरय्या फकीर , शिक्षण सभापती सफा गोठे , नगरसेवक कबीर काद्री , नगरसेविका जयश्री चितळे , सई चव्हाण , सीमा रानडे , स्वाती दांडेकर तसेच माजी नगरसेवक महंमद फकीर , प्रशांत मुळ्ये आदी उपस्थित होत्या.
या ठरावानुसार अंमलबजावणी झाली तर महाविकास आघाडीचे ‘ सुंदर चिपळूण ‘ चे स्वप्न पूर्ण होणार आहे म्हणून नगराध्यक्षा जाणीवपूर्वक सही करीत नाहीत . ३७ कामामध्ये समावेश असलेली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा , तसेच मिठागरी मोहल्ला रस्ता , मुरादपूर रस्ता , राधाकृष्ण नगर , बापट आळीमधील रस्ते ही कामे पूर्ण होणार नाहीत . नगराध्यक्षांना केवळ राजकारण करायचे आहे म्हणून रस्त्याच्या मुदत वाढ ठरावावर त्या सही करीत नाहीत . याबाबत शुक्रवारी आम्ही जनतेला नगरपरिषदमध्ये आणून नगराध्यक्षा खेराडे यांच्या राजकारणामुळे चिपळूणचा विकास कसा थांबला आहे हे दाखवून देणार आहोत.
🔥चुलीत भाजलेल्या काजु bbगरांची चवच न्यारी!🔥
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️
🥏9405184052 🪀
🥏9421544545 🪀
📤..फोन न लागल्यास मेसेज करा!
🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

