◾ वेंगुर्ले मध्ये उच्छांद मांडलेल्या माकडाला अखेर करण्यात आले जेरबंद
◾ वेंगुर्ले नगरपालिकेच्या नगरसेविका सौ.सुमन निकम व सामाजिक कार्यकर्ते तसेच नगरसेवक संदेश निकम यांनी उपद्रव करणाऱ्या माकडा बाबत वनविभागास दिली होती माहिती….
◾ अखेर कुडाळ वनविभाग व रेस्क्यु पथकाने पाच दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर माकडाला करण्यात आले जेरबंद..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : शुभम वैद्य
🎴वेंगुर्ले,दि-१८:- गेल्या 6 ते 8 महिन्यांपासुन वेंगुर्ला शहरातील मायबोली अपार्टमेंट व तेथील परिसरातील लहान मुलांवर महिला व वृद्ध लोकांच्या अंगावर धावून जाणे, त्यांना ओरबाडणे तसेच घरातील मौल्यवान वस्तुंची तोडफोड करणे, खिडक्यांच्या काचा फोडणे असे प्रकार करून उपद्रव करणाऱ्या माकडाला कुडाळ वनविभाग व रेस्क्यु पथकाने पाच दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर अखेर बुधवारी जेरबंद केले असल्याची माहिती कुडाळचे वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांनी दिली.
वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमुद करण्यात आले की, वेंगुर्ला नगरपरिषदेच्या नगरसेविका सुमन निकम,सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक संदेश निकम व मुख्याधिकारी अमित सोंडगे यांनी उपद्रव करणाऱ्या माकडा बाबत वनविभागास माहिती दिली होती.या माहिती नुसार कुडाळ वनपरिक्षेत्रामार्फत सातत्याने त्या वानरास (माकडास) पकडण्यासाठी प्रयत्न चालू होते.मात्र परिसरात उंच अपार्टमेंट तसेच लागुनच दाट झाडोरा असल्यामुळे हे माकड वनविभाग व रेस्क्यु पथकास हुलकावणी देत असायचे.दरम्यान वनक्षेत्रपाल शिंदे यांनी उपवनसंरक्षक सावंतवाडी यांचे मार्गदर्शनाने वनवृत्त कोल्हापूरचे पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर व त्यांची टीम यांना रेस्क्युसाठी बोलावले व सलग 5 दिवसांच्या प्रयत्नानंतर वनविभागाने बचावपथक व स्थानिकांच्या साहयाने वानराच्या नेहमीच्या वावराच्या ठिकाणी पिंजरा लावून त्यास यशस्वीपणे ताब्यात घेतले. व त्याची पशुवैद्यकिय अधिकारी यांचेकडून वैद्यकिय तपासणी करुन त्यास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.प्रकरणी वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांनी आवाहन केले की, वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत संरक्षित करणेत आलेल्या कोणत्याही वन्यप्राण्यास जसे माकड, हरिणवर्गीय, साप, मोर तसेच इतर वन्यप्राणी, पक्षी यांना पकडणे, जायबंदी करणे, त्यास खाद्य पदार्थ खाऊ घालणे इत्यादी बाबी प्रतिबंधित केलेल्या आहेत. पुढे ते म्हणाले वन्यप्राणी, पक्षांना ज्यावेळी लोकांकडून कुतुहालापोटी खाद्यपदार्थ दिले जातात तेव्हा त्या वन्यप्राण्यांना, पक्षाना त्याची सवय लागते ते पदार्थ जेव्हा त्यांना मिळत नाहीत तेव्हा अस्तिर होवून ते मानवावर हल्ले करण्याची शक्यता असते, तसेच खद्य पदार्थ खावू घातल्याने वन्यप्राण्यांच्या पक्षांच्या जीवनशैलीमध्ये बदल होण्याची शकयता असते. तसेच वन्यप्राण्यांकडुन मानवास इतर संसर्ग देखील होऊ शकतात. म्हणून वन्यप्राण्यास खाद्यपदार्थ खाऊ घालू नये.सदर वानराचे रेस्क्यू अमृत शिंदे, वनक्षेत्रपाल (प्रा.), कुडाळ यांनी श्री.एस.डी.नारनवर, उपवनसंरक्षक, वनविभाग सावंतवाडी तसेच श्री. आय.डी.जालगांवकर, सहा, वनसंरक्षक, सावंतवाडी यांचे मार्गदर्शनाखाली वनवृत्त कोल्हापूरचे पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.संतोष वाळवेकर, वनपाल मठ श्री.अ.स.चव्हाण, वनरक्षक श्री.विष्णू नरळे, बचाव पथक सदस्य अमित कुंभार, समर्थ कराळे, आकाश भोई, अनिल ढोले, कोकण वाइल्डलाइफ रेस्क्यु फोरम, सिंधुदूर्गचे सदस्य अनिल गावडे, महेश राऊळ, नाथा वेंगुर्लेकर, वैभव अमृसकर तसेच स्थानिक रहिवाशी शेख, कोचरेकर, दिलीप मालवणकर, भोगटे, निलेश तांडेल, प्रशांत नेरुरकर, अंब्रिश मांजरेकर यांनी यशस्वी केले.सदरच्या माकडाला वेळीच जेरबंद केल्यामुळे नगरसेविका सुमन निकम नगरसेवक संदेश निकम, तसेच स्थानिक रहिवासी यांनी वनविभाग व बचाव पथकाचे अभिनंदन केले.

