कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

चक्रीवादळग्रस्तांच्या मदतीला धावली भाजप; संदीप गावडे व गौरव मुळीक यांच्या पुढाकारातून पत्रे व कौलांचे वितरण

चक्रीवादळग्रस्तांच्या मदतीला धावली भाजप; संदीप गावडे व गौरव मुळीक यांच्या पुढाकारातून पत्रे व कौलांचे वितरण

संकटाच्या काळात दाखवली सामाजिक बांधिलकी; चौकुळ-बेरडकीतील नुकसानग्रस्त कुटुंबांना दिला तातडीचा दिलासा

सावंतवाडी : चौकुळ-बेरडकी परिसरात आलेल्या चक्रीवादळामुळे अनेक कुटुंबांच्या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक घरांची छप्परे उडून गेली, तर पत्रे व कौलांचेही मोठे नुकसान झाल्याने नागरिकांवर संकट कोसळले. या परिस्थितीची माहिती मिळताच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी तातडीने पुढाकार घेण्यात आला.
जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे आणि सावंतवाडी पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त कुटुंबांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर घरांची दुरुस्ती करता यावी यासाठी आवश्यक पत्रे व छपरासाठी कौलांचे वितरण करण्यात आले.
संकटाच्या काळात वेळेवर धावून आलेल्या या मदतीमुळे अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेचे आणि सामाजिक बांधिलकीचे ग्रामस्थांनी कौतुक केले.
यावेळी चौकुळचे सरपंच गुलाबराव गावडे, बूथ अध्यक्ष संतोष गावडे, गेळेचे सरपंच सागर ढोकरे, अच्युत गावडे, दयानंद गावडे तसेच चौकुळ गावातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संकटाच्या क्षणी लोकांच्या मदतीला धावून जाणे हीच खरी लोकसेवा असल्याचे या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!