कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾ इन्सुली-बांदा मध्यवर्ती असलेल्या तुळसान नदीला अत्याधुनिक पक्का बंधारा घाला ; भाजप पदाधिकाऱ्यांची सरकारकडे मागणी.. 

 

◾ कित्येक वर्षे सरकारकडे पाठपुरावा करून सरकार करतंय दुर्लक्ष ; भाजप पदाधिकारी आक्रमक ; सरकारला जाग येण्यासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा..

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : अंकुश नाईक

🎴बांदा,दि-१६:-  इन्सुली-बांदा‌ मध्यवर्ती असलेल्या तुळसान नदीवर एक अत्याधुनिक असा पक्का बंधारा घालण्यात यावा‌ जेणेकरून या नदीचे पाणी इन्सुली तसेच वाफोली या गावांना‌ फायदेशीर ठरेल अशी गेली कित्येक वर्षे बांदा माजी सरपंच मंदार कल्याणकर तसेच विद्यमान पंचायत समिती सभापती श्री शितल राऊळ यांनी सरकारकडे मागणी करुन पाठपुरावा केला आहे तरीसुद्धा कुठच्याही प्रकारची प्रकिया सरकारने आपल्या दरबारी केलेली नाही.दरवर्षी बांदा येथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहभागातून नदीला जेसीबीच्या सहाय्याने बंधारा घातला जातो आणि साहजिकच त्याचा फायदा इन्सुली-वाफोली या गावांना‌ होतो, त्यामुळे अशाच प्रकारचा पण अत्याधुनिक पक्का बंधारा सरकारने घालावा अशी अनेक निवेदने देण्यात आली ‌परंतु सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे परंतु आता जर सरकारने याकडे लक्ष न‌ दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा बांदा-इन्सुली भाजप पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे.

आज बांदा-इन्सुली येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी तुळसान‌ नदीची पाहणी केली यावेळी बांदा माजी सरपंच श्री.मंदार कल्याणकर, पंचायत समिती सभापती श्री.शितल राऊळ, इन्सुली ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर,बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते सिध्देश पावसकर,आबा धारगळकर,बाबा काणेकर, संदीप देसाई यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!