◾ बावळाट तिठ्यालगत साताऱ्यातील बोलोरो चालकाची आत्महत्या..
◾ संशयास्पद मृत्यू असल्याचा नातेवाईकांचा आरोप..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि-१६:- सावंतवाडी आंबोली मार्गावरील बावळाट तिठ्यालगत सातारा येथील एका बोलेरो चालकाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अभय बापु हंगे (२६, रा. कळशी, ता. माण, जि. सातारा ) असे या मृत युवकाचे नाव असून याबाबतची फिर्याद विशाल रामचंद्र बुधावळे यांनी सोमवारी रात्री उशिरा सावंतवाडी पोलिसात दिली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच संबंधित बोलेरो चालकाचे नातेवाईक सावंतवाडीत दाखल झाले असून त्यांनी या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे.
प्राप्त माहितीनुसार मृत बोलेरो चालक अभय हंगे याच्या ताब्यात असलेल्या बोलेरोचा (एम. एच. ११ सीयू ०७८४) सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास बावळाट तिठ्यालगत एका वेगन आर गाडीशी अपघात झाला होता. मात्र, सदरचे प्रकरण परस्पर मिटविण्यात आले होते. या घटनेनंतर काही वेळातच काही अंतरावर जाऊन त्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे संबंधित चालकाचा मृत्यू संशयास्पद असल्याचे त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे असून या प्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

