Tuesday, August 11, 2026
Latest:
कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾ सावंतवाडी येथील अनिल भिसे मित्रमंडळाच्या वतीने व्यावसायिक छायाचित्रकारांसाठी राज्यस्तरीत छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन..

 

◾ जेष्ठ पत्रकार कै.मुरलीधर गणेश उर्फ बंडोपंत भिसे यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्पर्धेचे आयोजन..

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी दि.१६ : – सावंतवाडी येथील अनिल भिसे मित्रमंडळाच्या वतीने व्यावसायिक छायाचित्रकारांसाठी राज्यस्तरीत छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.येथील छायाचित्रकार तथा जेष्ठ पत्रकार कै.मुरलीधर गणेश उर्फ बंडोपंत भिसे यांच्बया स्मृतिदिनानिमित्त २८ मार्चला ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.अशी माहिती छायाचित्रकार अनिल भिसे यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.

त्यात असे नमूद करण्यात आले आहे की,संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत ८ १२ आकारामध्ये स्पर्धकांनी आपले छायाचित्र द्यायचे आहे.एका स्पर्धकाचे एकच छायाचित्र स्पर्धेसाठी असणे आवश्यक आहे.छायाचित्राच्या मागे स्पर्धकाचे नाव, पत्ता व मोबाईल नंबर लिहावयाचा आहे. दरम्यान संबंधित छायाचित्र रत्नाकर माळी (९४२०७३९१७३) श्रीकृष्ण मुद्रणालय वैश्यभवन हॉल समोर,गवळीतिठा,सावंतवाडी याठिकाणी आणून दयावयाचे आहे. स्पर्धेचा निकाल बंडोपंतांच्या स्मृतिदिना दिवशी ३० मार्च २०२१ रोजी जाहीर करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!