कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾ जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं .१ ची पाचवीत शिकत असलेली विद्यार्थीनी युग्धा बांदेकर अबॅकस स्पर्धेत राज्यात प्रथम..

◾या तिच्या यशा बद्दल सर्व स्तरावरून होत आहे तिचे अभिनंदन..

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा दि.१६-: जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं .१ ची इयत्ता पाचवीत शिकत असलेली विद्यार्थीनी युग्धा दीपक बांदेकर हिने अबॅकस स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. युग्धा ही बांदा येथील एकलव्य अकॅडमीची विद्यार्थीनी असून इस्लामपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय अबकस स्पर्धेत सहभागी झाली होती. या स्पर्धेत अबॅकसच्या माध्यमातून ५ मिनिटात १२० पैकी १२० गणिते अचूक सोडवून युग्धाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत राज्यभरातून दोन हजारहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. अबॅकसमुळे मुलांची एकाग्रता व आकलन शक्तीमध्ये कमालीची वाढ होऊन बौध्दिक व व्यक्तिमत्त्व विकासास चालना मिळते. युग्धा हिला एकलव्य अबॅकस सेंटरच्या शिक्षिका स्नेहा केसरकर /पावसकर यांचे मार्गदर्शन लाभले. युग्धाने मिळविलेल्या या यशाबद्दल बांदा केंद्रशाळेच्या मुख्याध्यापिका सरोज नाईक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नीलेश मोरजकर, बांदा सरपंच अक्रम खान व शिक्षक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे. युग्धाने मिळविलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!