कोकणक्रीडामहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

◾ शिवकृपा कला क्रीडा मंडळ चव्हाणवाडी म्हापण “शिवचषक 2021” चे दिमाखात उद्घाटन..

 

◾ युवामोर्चा वेंगुर्ले ता.अध्यक्ष प्रसाद पाटकर यांच्या शुभहस्ते स्पर्धेचे झाले उद्घाटन..

🖥️ Kokan Live Braking News

 ✍️ प्रतिनिधी : समीर चव्हाण

 🎴वेंगुर्ले, दि-१६:- श्री शिवकृपा कला क्रीडा मंडळ चव्हाणवाडी म्हापण आयोजित “शिवचषक 2021” या स्पर्धेचे उद्घाटन काल सायंकाळी पाच वाजता युवामोर्चा अध्यक्ष ता. वेंगुर्ले प्रसाद पाटकर यांच्या शुभहस्ते उद्घाटन दिमाखात पार पडले तर तत्पूर्वी फित कापून मैदानाचे उद्घटन भाजपा जिल्हा कार्यकारिणी सहसचिव विजय ठाकूर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. दीप प्रज्वलन व श्रीगणेश, संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उद्घाटन सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला.

या स्पर्धेचे आयोजन मंदिर उभारणी निधी संकलन या हेतूने करण्यात आले आहे असे आयोजांकडून सागण्यात आले. तसेच या स्पर्धेसाठी सढळ हस्ते मदत करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्तींचे आभार मानून त्यांच्या सुख समृद्धी, निरोगी दीर्घायुष्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना केली.

उपस्थित मान्यवरांनी मंडळाच्या या शुभकार्याला व स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. माजी जि. प. सभापती तथा भाजपा जिल्हा चिटणीस निलेश सामंत, पाट हायस्कूल संचालक देवदत्त साळगावकर, दोडामार्ग उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण, सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा सरचिटणीस मनिष दळवी हे मान्यवर आपल्या व्यस्त वेळापत्रकामुळे उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाही तरी त्यांनी स्पर्धेसाठी आपल्या शुभेच्छा आपल्या प्रतिनिधी मार्फत पाठवल्या.

या उद्घाटन समारंभानिम्मित युवामोर्चा वेंगुर्ले तालुका अध्यक्ष प्रसाद पाटकर, माजी जि. प. सभापती विकास गवंडे, माजी सरपंच म्हापण गुरुनाथ मडवळ, ग्रा. प. सदस्य म्हापण गुरुप्रसाद चव्हाण, उपसरपंच म्हापण अशोक पाटकर, पाट हायस्कूल शिक्षक प्रशांत चव्हाण, युवासेना तेंडोली विभागप्रमुख शंकर पाटकर, भाजपा जिल्हा कार्यकारिणी सहसचिव विजय ठाकूर या मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

या उद्घाटन सोहळ्याला व्यासपीठावर युवामोर्चा वेंगुर्ले तालुका अध्यक्ष प्रसाद पाटकर, साई श्रध्दा कला क्रीडा मंडळ चव्हाणवाडी म्हापण अध्यक्ष तथा युवामोर्चा वेंगुर्ले उपतालुका प्रमुख चंद्रकांत चव्हाण, श्री शिवकृपा कला क्रीडा मंडळ चव्हाणवाडी म्हापणचे अध्यक्ष देवदास चव्हाण, सचिव मंदार चव्हाण, खजिनदार सिताराम उर्फ शाम चव्हाण, सौ. नम्रता चव्हाण, प्रकाश वसंत चव्हाण, पाट हायस्कूल कर्मचारी भूषण देसाई, श्रीधर चव्हाण, पाट हायस्कूल शिक्षक तानाजी काळे, माजी जि. प. सभापती विकास गवंडे, माजी सरपंच म्हापण गुरुनाथ मडवळ, ग्रा. प. सदस्य म्हापण गुरुप्रसाद चव्हाण, उपसरपंच म्हापण अशोक पाटकर, पाट हायस्कूल शिक्षक प्रशांत चव्हाण, युवासेना तेंडोली विभागप्रमुख शंकर पाटकर, भाजपा जिल्हा कार्यकारिणी सहसचिव विजय ठाकूर, मंडळाचे कार्यकर्ते व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!