धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास पाठयपुस्तकात समाविष्ट होणे गरजेचे..विवेक पंडित.
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सिंधुदुर्ग :*.छत्रपती संभाजी महाराजांनी आमिषाला बळी न पडता धर्मासाठी, स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान केले. हा आपला पराक्रमी इतिहास आहे. परंतु आज काही हिंदू इतिहास विसरल्याने नोकरी, पैसे इत्यादींच्या लोभासाठी आपला धर्म सोडत आहेत. त्यामुळे शालेय पाठयपुस्तकांमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानावर धडा समाविष्ट करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कुडाळ येथील श्री. विवेक पंडित यांनी केले. ते शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने आयोजित छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास कार्यक्रमात बोलत होते.
शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने कुडाळ, जिजामाता चौक येथील जिजामाता स्मारक येथे फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन मृत्यूजंय आमावस्या म्हणजेच १४ मार्च ते १२ एप्रिल २०२१ या कालावधीत बलिदान मास पाळण्यात येणार आहे. या कालावधीत प्रतिदिन सायंकाळी ७ वाजता सर्व शिवप्रेमी जिजामाता स्मारक याठिकाणी एकत्र येऊन संभाजी महाराजांना श्रध्दांजली अर्पण करणार आहेत.
ज्याने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली त्याच्या नावाने महाराष्ट्र राज्यात एक जिल्हा आहे, हे आपले मोठे दुर्दैव आहे, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे दोडामार्ग तालुका कार्यवाहक श्री. मंगेश पाटील यांनी केले. ही जखम धुवून काढण्यासाठी बलिदान मास सर्व गावांमध्ये पाळला गेला पाहिजे, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.
शालेय अभ्यासक्रमात छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाचा धडा समाविष्ट करण्यासाठी शिवप्रेमी सिंधुदुर्ग आणि समविचारी संघटना मोहीम हाती घेत आहे, अशी माहिती शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेचे श्री. रमाकांत नाईक यांनी दिली.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

