आरोग्यकोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾ माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रवीण भोसले यांनी घेतली आज कोव्हीड लस.. 

🖥 Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि-१३:-  माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रवीण भोसले यांनी आज कोव्हीड लस घेतली आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील कोव्हीड लसीकरण केंद्रात त्यांनी ही लस घेतली आहे. देशभरात दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरूवात झाल्यानंतर प्रवीण भोसले यांनी कोरोना लस घेतली. याआधी प्रवीण भोसले यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर गोवा इथं उपचार करण्यात आले होते. कोऱोनावर त्यांनी यशस्वी रित्या मात केली. या कालावधीत स्वतः पुढाकार घेत त्यांनी आपल्या निवासस्थानी निर्जंतुकीकरण मोहीम राबविली होती. दरम्यान, लोकांमध्ये असलेला लसीबाबतचा गैरसमज दूर व्हावा या हेतूने माजी राज्यमंत्री प्रवीण भोसलेंनी उपजिल्हा रुग्णालयात कोव्हीड लस घेतली. यावेळी डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, डॉ. महमदतलहा बागवान, डॉ. पांडुरंग वजराटकर, डॉ. सावंत, डॉ. कोरे,डॉ. लादे, डॉ. चौगुले, सीस्टर श्रीम. राऊळ, श्रीम. नाईक, श्रीम. काळसेकर, श्रीम. पाटकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!