◾ सावंतवाडीतील मटक्याच्या अड्ड्यांवर कायमस्वरूपी कारवाई करा ; मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी, दि-१३:- सावंतवाडी तालुक्यात आज शहरातील काही मटका व्यावसायिकांवर गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केली परंतु सावंतवाडी तालुक्यांमध्ये अन्य शहरांमध्येही तसेच बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात मटका घेतल्या जातो फक्त महिन्याला दाखवण्यापुरते कारवाई नको तर कायमस्वरूपी कारवाई करा अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी केली आहे.
सावंतवाडी शहरात मोठ्या प्रमाणावर मटका चालतो परंतु जाणून बुजून त्याच्याकडे दुर्लक्ष केला जातो आज युवा पिढी ची ओढ मटका कडे भरपूर लागलेली आहे त्याच प्रमाणे ऑनलाइन मटका समजतो अनेक बाजारपेठेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मटका चालतो आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पोलिसांना वारंवार सांगितलं की तुम्ही मटका जुगारावर कारवाई करा परंतु महिन्याला कुठेतरी पाच सहा हजाराचा मुद्देमाल दाखवायचा आणि कारवाई करायची हे योग्य नाही त्याच्यामुळे पोलिसांनी याची दखल घेतली नाही तर या विरोधात आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा गवंडे यांनी दिला आहे.
आज युवा पिढी रोजगार नसल्यामुळे कोठेतरी मटका लागेल आणि आपलं भाग्य उजळेल या नादात लागून मोठ्या प्रमाणात मटका खेळला जातो याची गंभीर दखल घ्या नाहीतर आम्ही दाखवतो तुम्हाला मटका कुठे कुठे चालतो ते नुसती तात्पुरती कारवाई करू नका अशा इशारा मनसेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी दिला आहे सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती डॉ रोहिणी सोळंकी यांच्याशीही यासंदर्भात मी चर्चा केली आहे त्यांनी योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले आहे तसेच सावंतवाडी चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जयंत जावडेकरांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अभिनंदन त्यांनी धाडसी जे पाऊल मटका विरोधात उचललं त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे.असे मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी म्हटले आहे.

