◾ सावंतवाडी व बांदा पोलीस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करून साजरा केला “जागतिक महिला दिन”
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी, दि-१३:- “जागतिक महिला दिन” हा वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याच्या दृष्टीने रोटरी क्लब, सावंतवाडीने फ्रंट लाइन वर्कर्स साठी अर्थात सावंतवाडी व बांदा पोलीस ठाण्याचे महिला पोलिस कर्मचारी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले. यावेळी डी.वाय.एस.पी. डॉ रोहिणी सोळुंखे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. रोहिणी मॕडम या स्वतः MBBS असल्याने महिलांचे शारीरिक समस्यांची जाण असल्याने रोटरी क्लब, सावंतवाडीनी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिराचे कौतुक केले. ए.पी.आय. स्वाती यादव मॅडम यांनीही यावेळी उपस्थित राहून महिला पोलिस कर्मचाऱ्यांसाठी हे आरोग्य शिबिर आयोजित केल्याबद्दल आभार मानले.
या महिला पोलिस कर्मचार्यांसाठी बीपी, ब्लड शुगर, हिमोग्लोबिन, विनामूल्य सोनोग्राफी तपासून त्यांच्या आरोग्याच्या समस्यांसाठी औषधोपचार दिले. या कार्यक्रमाच्या निमित्याने उपस्थित राहीलेल्या इनरव्हील सदस्या सौ विद्याताई करंदीकर यांचा वाढदिवसही साजरा केला आणि इनरव्हील सदस्यांसाठी आरोग्य तपासणी, हिमोग्लोबिन, रक्तातील साखर आणि विनामूल्य सोनोग्राफी देखील केली. डीवायएसपी डॉ रोहिणी सोळुंखे मॅडम यांनी यशराज रुग्णालयाच्या कर्मचार्यांचे आभार मानले. क्लबचे सचिव रो.दिलीप म्हापसेकर यानी कमवत्या स्रीयाना नेहमी तारेवरची कसरत करावी लागते. अर्थात काही गुण हे उपजतच स्रीया मध्ये असल्याने हे सर्व निभावत नेतात हे सांगुन समस्त स्री वर्गाचे अभिनंदन केले आणि कृतन्यता व्यक्त केली. सर्व स्रीयाना डी.वाय.एस.पी. डॉ रोहिणी सोळुंखे गुलाब पुष्प देण्यात आली.
तसेच आज जागतिक महिला दिनाच्या निमित्याने रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी च्या वतीने आहार तज्ञ रो. विनया बाड आणि रोटरी क्लब, सावंतवाडीचे अध्यक्ष रो.डॉ. राजेश नवांगुळ यांच्या सौभाग्यवती सौ.मनीषा नवांगुळ यांनी ” माजी सैनिक संघटनेच्या वतीने माजी सैनिकांच्या स्त्रियांसाठी आरोग्या विषयी मार्गदर्शन आणि आहाराविषयी मार्गदर्शन केले. सदर मार्गदर्शनाचा लाभ माजी सैनिकांच्या 50 ते 60 स्त्रीवर्गाने घेतला. स्त्रियांच्या आरोग्यविषयीच्या सर्व समस्यांचे निराकरण यावेळी करण्यात आले . रोटरी क्लब, सावंतवाडीच्या या उपक्रमाचे माजी सैनिक संघटनेने आभार व्यक्त करून भविष्यात अशा समाजसेवी उपक्रमातून लाभ घ्यावा असे मत व्यक्त केले . जागतिक महिला दिनानिमित्त असे विविध उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल अध्यक्ष रो डॉ राजेश नवांगुळ आणि सेक्रेटरी रो.दिलीप म्हापसेकर यांनी समाधान व्यक्त केले .

