आणखीकोकणमुंबईशासकीय

पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते पासबुक विद्यार्थांच्या पालकांना देण्यात आले…

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : किशोर धुरे

🎴मुंबई : दि. १३ बृहन्मुंबई महानगरपालिका के/पश्चिम संचालित आदर्श नगर म.न.पा एम.पी.एस शाळा ( इंग्रजी माध्यम ) ओशिवरा, जोगेश्वरी पश्चिम शाळेत मुख्याध्यापिका काश्मीरा राजीव खंधाडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रमुख पाहुणे कॅप्टन राकेश कोएल्हो, ओशिवरा लोखंडवाला सिटिझन फाउंडेशन, ट्रस्टी , एन जी ओ सेल अध्यक्ष, उत्तर पश्चिम जिल्हा मुंबई भाजपा. यांच्या उपस्थितीत शाळेतील विद्यार्थ्यांची पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते पास बुक विद्यार्थांच्या पालकांना कार्यक्रमात देण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदना करून करण्यात आली. पालकांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापिका काश्मीरा म्हणाल्या, शाळेतील विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफिस बचत खाते पास बुक काढण्यासाठी कॅप्टन. राकेश कोएल्हो यांनी सहकार्य आणि प्रयत्न केले. त्यासाठी त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आम्ही शाळेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला.

कार्यक्रमादरम्यान आम्ही सर्व शासकीय नियमांचे पालन करून हा कार्यक्रम घेतला. महेश पालकर ( एज्युकेशन ऑफिसर ) सुजाता खरे ( डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर ) अशोक मिश्रा ( supritendent ) यांच्या सहकार्याने आमच्या शाळेचे शैक्षणिक कार्य ( ऑनलाईन ) पद्धतीने सुरळीत सुरू आहे. निसार खान ( A/O ) अस्मिता कासले (B.O) हे वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने शाळेला भेट देतात. तसेच ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थी व शिक्षक यांना मार्गदर्शन करतात. महत्वाचे म्हणजे कॅलिफॉर्नियातील एन जी ओ ( NGO ) इन ए टॅलेंट ( in A Talent ) या एन जी ओ च्या वतीने कल्पना आणि मनीषा या दोघी दर रविवारी 11 वाजता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. सध्या ऑनलाईन पद्धतीने शिक्षणचालू आहे.त्याला विद्यार्थी व पालक चांगल्या तऱ्हेने सहकार्य करत आहेत.तसेच कॅप्टन राकेश कोएल्हो यांनी कार्यक्रमात पालकांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला शिक्षक फाल्गुनी पटेल,सेल्वी जोसेफ, तसेच पालक व इतर मान्यवर उपस्थित होते. या सर्वांचे आभार व्यक्त करून मुख्याध्यापिका काश्मीरा नी कार्यक्रमाचे समापन केले.

🔥चुलीत भाजलेल्या काजु bbगरांची चवच न्यारी!🔥

💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..

🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..

💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..

⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!

🤷🏻‍♂️आजच संपर्क करा ⬇️
🥏9405184052 🪀
🥏9421544545 🪀

📤..फोन न लागल्यास मेसेज करा!

🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!