कोकणमहाराष्ट्रराजकीयशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾ सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात उभा डंपर गायब होण्याच्या मागे महसूल व पोलीस प्रशासन यंत्रणेचा हात;मनसेचे शहर अध्यक्ष आशिष सुभेदार

 

◾ दोषींना तात्काळ अटक न केल्यास उपोषणचा इशारा.. 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

 🎴सावंतवाडी, दि-१३:-  सावंतवाडी तालुक्यातील तहसीलदार कार्यालयात उभा डंपर गायब होण्याच्या मागे महसूल व पोलीस प्रशासन यंत्रणेचा हात आहे असा आरोप मनसेचे शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांनी केला आहे.

दरम्यान तो डंपर पळवून नेणारा कोण याचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेऊन संबंधिताला तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा मनसेच्यावतीने तहसीलदार कार्यालया समोर उपोषण करू असा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबत श्री सुभेदार यांनी प्रसिद्धी पत्रक दिला आहे. यात असे म्हटले आहे सावंतवाडी महसूल यंत्रणेकडून बेकायदा वाळू वाहतूक करणारे डंपर पकडण्यात आले होते त्यातील एक डंपर अज्ञाताने पळवून नेला असे महसूल यंत्रणेचे म्हणणे आहे मात्र परिसरात सीसीटीव्ही तसेच रात्रीच्या पाळीचे कर्मचारी असताना हा प्रकार झाला कसा…याचा अर्थ यामागे पोलीस व महसूल प्रशासनाच्या काही लोकांचा हात असल्याचा संशय नाकारता येत नाही.

त्यामुळे या प्रकरणात दोषी असलेल्या संबंधिताला तात्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करू असा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!