आणखीकणकवलीकोकणराजकीयसिंधुदुर्ग

केंद्र सरकारकडुन राबविण्यात येत असलेल्या हगणदारीमुक्त शहरमधील ओडीएफ डबल प्लस या रँकमध्ये कणकवली…

◼️कणकवली शहरवासीयांच्या सहकार्यामुळेच हे स्थान मिळवणे शक्य – समीर नलावडे

🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. १३ ​केंद्र सरकार कडून राबविण्यात येत असलेल्या हगणदारीमुक्त शहर मधील ओडीएफ डबल प्लस या रँक मध्ये कणकवली नगरपंचायतने अखेर स्थान मिळवले आहे. कणकवली शहरवासीयांच्या सहकार्यामुळेच हे स्थान मिळवणे शक्य झाल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. ओडीएफ प्लसचा टप्पा पार केल्यानंतर ओडीएफ प्लस प्लस मानांकनासाठी रँक मध्ये येण्यासाठी कणकवली नगरपंचायतने प्रयत्न सुरू केले होते. त्याचाच एक भाग म्हणून या रँक मध्ये निवड होणाऱ्या नगरपंचायत हद्दीतील शौचालयांची व त्या अनुषंगिक बाबींची पाहणी केंद्राच्या पथकाने ​२५ व ​२६ फेब्रुवारी रोजी दोन दिवस कणकवलीत केली.

या पथकाने केलेल्या पाहणीत शहरातील सार्वजनिक शौचालये आणि सांडपाणी व्यवस्थेची पाहणी केली. या पाहणी दरम्यान कणकवली सिद्धार्थ नगर, कणकवली मच्छिमार्केट, बस स्थानक, कणकवली दक्षिण बाजारपेठ, जानवली नदी, छत्रपती शिवाजी महाराज नगर, वरची वाडी, पोयेकर वाडी, मधलीवाडी, निमे वाडी, कणकवली उत्तर बाजारपेठ, साईनगर गार्डन, रेल्वे स्टेशन, नाथ पै नगर रोड, कनक नगर रोड, शिवशक्ती नगर गार्डन, मुंडेश्वर मैदान, गार्बेज डेपो मधील fstp प्लांट आदींची या पथकाद्वारे पाहणी करण्यात आली होती.

त्यानंतर या पथकाकडून अहवाल केंद्राकडे सादर करण्यात आला होता. त्या अहवालानुसार नगरपंचायतने केलेले सकारात्मक काम व हागणदारी मुक्त शहरचा दर्जा राखण्यासाठी केलेले नियोजन अखेर कामी आले. कणकवली नगरपंचायत ओडीएफ डबल प्लस मध्ये स्थान मिळवल्याने आता ,अखेर स्वच्छ सर्वेक्षण ​२०२१ मूल्यमापन यादीत वरच्या स्थानी कणकवली नगरपंचायतचा समावेश होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी ओडीएफ डबल प्लस मानांकन मिळण्यामागे कणकवली शहरवासीयांनी दिलेली साथ महत्त्वाची असल्याचे सांगितले. शहरवासीयांच्या पाठिंब्यामुळेच या रँक मध्ये नगरपंचायत चा समावेश झाला. त्यामुळे शहरवासीयांचे आभार मानत असल्याचेही नलावडे यांनी सांगितले.

🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻
http://kokanlivebreaking.live

🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻
https://t.me/kokanlive

🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻
https://twitter.com/livekokan

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!