स्वच्छ सर्वेक्षण २०२०-२१ अंतर्गत केंद्रीय पथकाने शहरातील सर्व १७ प्रभागांची पाहणी…

🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. १३ स्वच्छ सर्वेक्षण २०२०-२१ अंतर्गत केंद्रीय पथकाने शहरातील सर्व १७ प्रभागांची पाहणी केली यात तब्बत ३५० नागरिकांना स्वच्छतेबाबत प्रश्न करून माहिती घेतली. त्याबरोबरच ठंपिंग ग्राउंड, नदी-नाले आणि रस्त्यांची स्वच्छतेच्या अनुषंगाने पाहणी केली. केंद्रीय पथकाचा दौरा गुप्त असल्याने त्यांनी पत्रकारांशी बोतण्यास नकार दिला. सन २०१४ पासून केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियान देशभरात राबविले जात आहे. यात देशातीत सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा (नगरपालिकांचा) सहभाग वाढून हे अभियान यशस्वी करण्यासाठी नगरपालिकांची स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा ही देशपातळीवर घेतली जात आहे. या स्पर्धेत कणकवली नगरपंचायतीनेही सहभाग घेतला आहे. त्याअनुषंगाने केंद्राच्या दोन सदस्यीय समितीने शहराच्या विविध भागाची पाहणी केली.

स्वच्छ स्पर्धेच्या पश्चिम विभागीय झोनमध्ये तीन वर्षापूर्वी कणकवली नगरपंचायतीने ३६ वा क्रमांक मिळविता होता. तर गतवर्षी २३२ क्रमांक आला होता. त्यानंतर आता पहिल्या पंचवीस क्रमांकामध्ये कणकवली शहर असावे यादृष्टीने नगरपंचायतीने विविध स्वच्छता उपक्रम सुरू केले आहेत. या उपक्रमांची पाहणी केंद्रीय पथकाने केली. केंद्रीय पथकाने सर्वप्रथम शहरातील सर्व सार्वजनिक शौचालये आणि तेथील सुविधा तपासल्या. त्यानंतर डंपिंग ग्राउंडवर कचरा विलगीकरणाची स्थिती, जलशुद्धीकरण यंत्रणा, शहरातील रस्त्यालगत असलेली कचऱ्याची स्थिती, नदी-नाल्यांमध्ये सांडपाणी सोडले जात नाही ना? या सर्वांची पाहणी केली. स्वच्छतेबाबत नगरपंचायतीकडून काय उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याबाबत नागरिक समाधानी आहेत का? नागरिकांच्या आणखी काय अपेक्षा आहेत. याबाबत केंद्रीय पथकाने तब्बत ३५० नागरिकांच्या मुलाखती घेतल्या. नगरपंचायत कर्मचार्यांसोबत अचानकपणे कुठल्याही प्रभागात जाऊन हे पथक माहिती घेत होते. मात्र केंद्रीय समितीचा दौरा आणि नागरिकांकडून मिळालेता फिडबॅक याबाबत कोणतेही भाष्य करण्यास या समितीने नकार दिला.

🔥चुलीत भाजलेल्या काजु bbगरांची चवच न्यारी!🔥

💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..

🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..

💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..

⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!

🤷🏻‍♂️आजच संपर्क करा ⬇️
🥏9405184052 🪀
🥏9421544545 🪀

📤..फोन न लागल्यास मेसेज करा!

🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!