◾ मुळस – हेवाळे पूल दुरूस्तीचे काम येत्या दोन दिवसात सुरू न केल्यास प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता आंदोलन करणार ; सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम देसाई
◾ संबंधित विभागाने सामान्य नागरिकांच्या भावनांशी खेळू नये..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-१२ :- मुळस – हेवाळे पूल दुरूस्ती व्हावे यासाठी अनेक वेळा ग्रामस्थांनी उपोषणे केली परंतु संबंधित विभागाने या विषयावर पुर्ण पणे पाठ फिरवली आहे.
फेब्रुवारी महिन्यात १२ तारीखला ग्रामस्थांनी या पुलासाठी उपोषण छेडले होते तेव्हा त्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता माने यांच्या लेखी आश्वासना नंतर उपोषण कर्त्यांनी उपोषण मागे घेतले होते. परंतु अजुन त्याठिकाणा वरील साधा दगड देखील बांधकाम विभागाने हलविला नाही.
त्यामुळे मुळस – हेवाळे ग्रामस्थांनी संतप्त भूमिका घेत प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता आंदोलन छेडणार असल्याचे तेथील सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम देसाई यांनी सांगितले.

