◾ सद्गुरु साटम महाराज बाविसाव्या विशेष अंका साठी भक्तगणांना आलेले आनुभव पाठविण्याचे आवाहन..
◾ आमची एकजूट चे संपादक सीताराम गावडे यांनी केले आवाहन..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि-१२:- कोकण ही साधुसंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी,अशा या भूमीत अनेक सत्पुरुषांनी जन्म घेऊन आपल्या दैवी चमत्काराच्या सामर्थ्यावर भाविकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले, व वाममार्गाकडे चाललेल्या पिढीला सद् मार्गाकडे वळविण्याचे काम केले,असेच एक सत्पुरुष व संस्थांचे गुरु सद्गुरु साटम महाराज.
सद्गुरु साटम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले दाणोली हे गाव तीर्थक्षेत्र बनले, दत्त अवतारी या सत्पुरूषाने आपल्या कालखंडात अनेक चमत्कार केले, ते ग्रंथरूपात उपलब्धही आहेत ,मात्र ग्रंथ,चरीत्र वाचणे हे सगळ्यांनाच शक्य होत नाही म्हणूनच त्यांच्या जीवन कार्याचा आढावा घेणारा विशेषांक गोष्टी रूपात त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आम्ही दरवर्षी प्रसिद्ध करतो.
यावर्षी बाविसावा अंक प्रसिद्ध करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे, सिंधुदुर्गातील नव्हे तर महाराष्ट्रातील भक्तगणांना सद्गुरु साटम महाराज यांच्या विषयी आलेले अनुभव,काही माहिती असेल तर त्यांनी ती त्यांनी साप्ताहिक आमची एकजूट कडे पाठवून द्यावी जेणेकरून आमच्या विशेषांकात प्रसिद्ध करता येईल,त्यासाठी खालील नंबर वर व्हाट्सअप वर माहिती पाठवून द्यावी ही विनंती ८४८४८२७९९३.

