🛑सिंधुदुर्गातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा उद्यापासून सकाळच्या सत्रात.
*🛑सिंधुदुर्गातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा उद्यापासून सकाळच्या सत्रात.*
*🛑१९ ते ३० जूनपर्यंत बदललेल्या वेळापत्रकानुसार शाळा भरणार.*
*🛑सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत भरणार शाळा.*
*🛑महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या मागणीला आणी पाठपुराव्याला मोठे यश.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्ग, दि- १८:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर अखेर जिल्हा परिषद प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा १९ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत सकाळच्या सत्रात भरविण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना तीव्र उष्णतेपासून दिलासा मिळणार असून पालक आणि शिक्षकांमधूनही समाधान व्यक्त होत आहे.सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत शाळा भरणार आहेत.याबाबतचे लेखी आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी किंजवडेकर यांनी काढले असून, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्ह्यातील वाढत्या तापमानामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत होती. विशेषतः दुपारच्या वेळेत शाळा भरत असल्याने विद्यार्थ्यांना घराकडून शाळेत जाताना मोठ्या उष्णतेचा सामना करावा लागत होता. दुपारच्या वेळी वर्गात कडक उष्णतेचा सामना मुलांना करावा लागत होता. याची दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने निर्णय घेतला.या निर्णयासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, जिल्हा परिषद सदस्य रूपेश पावसकर तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन शाळांचे वेळापत्रक सकाळच्या सत्रात करण्याची मागणी विविध स्तरातून करण्यात आली होती. अखेर या प्रयत्नांना यश आले असून जिल्हा परिषद प्रशासनाने आदेश जारी केले आहेत.या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी १९ जूनपासून सकाळच्या सत्रात वर्ग भरवावेत आणि ३० जूनपर्यंत बदललेले वेळापत्रक लागू राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उष्णतेपासून दिलासा मिळणार असून शैक्षणिक कामकाजही सुरळीतपणे पार पाडता येणार आहे.दरम्यान, या निर्णयाचे पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात येत असून, विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देणारा हा निर्णय असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरातून व्यक्त होत आहे.
या निर्णयाबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे,जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर,जि.प.सदस्य रूपेश पावसकर,माध्यमिक शिक्षणाधिकारी किंजवडेकर, मराठा शिक्षक संघटना,कास्ट्राईब शिक्षक संघटना,शिक्षक भारती या सर्वांचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने आभार व्यक्त केले आहे…. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने या सकाळ सत्रातील शाळा भरविण्याबाबत सुरुवातीपासूनच पाठपुरावा केला होता.आणि त्याला यश आल्याचा दावा करत या निर्णय घेतल्याबद्दल जिल्हा परिषद प्रशासनाचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने आभार व्यक्त केले आहेत….
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

