🛑आंबोलीच्या जंगलात शिकाऱ्यांवर वनविभागाचा मोठा घाव; ७ जण ताब्यात, शस्त्रसाठ्यासह आलिशान कार जप्त.
*🛑आंबोलीच्या जंगलात शिकाऱ्यांवर वनविभागाचा मोठा घाव; ७ जण ताब्यात, शस्त्रसाठ्यासह आलिशान कार जप्त.*
*🛑पर्यटनाच्या आडून सुरू होता वन्यजीवांचा मृत्यूचा खेळ; साळिंदर, पिसई, कटिंदर व माऊस डिअरची शिकार उघड.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १८:-* आंबोली-नेने जंगल परिसरात वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळीवर वनविभागाने मोठी कारवाई करत ७ जणांना ताब्यात घेतले आहे. काल रात्री दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये ही धडक मोहीम राबविण्यात आली. यामध्ये कोल्हापूर येथील ६ जणांसह एका स्थानिक संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून दोन जण अंधाराचा फायदा घेत पसार होण्यात यशस्वी झाले आहेत.
या कारवाईत गावठी बंदुका, काडतुसे, बॅटऱ्या, टॉर्च, तलवार तसेच कोल्हापूर पासिंगची आलिशान एमजी हेक्टर कार जप्त करण्यात आली आहे. याशिवाय शिकार केलेले साळिंदर, पिसई, कटिंदर आणि माऊस डिअर या वन्य प्राण्यांचे मृत अवशेषही वनविभागाच्या हाती लागले आहेत. ही माहिती सावंतवाडीचे सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे यांनी दिली.
वनविभागाच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, चौकुळ परिसरातील विठू वाघू कोकरे (वय ४५) हा साळिंदराची शिकार करून तो घेऊन जात असताना सापळा रचून त्याला पकडण्यात आले. रात्रीच्या अंधारात विजेरीच्या प्रकाशात तब्बल दीड किलोमीटर माग काढून वनकर्मचाऱ्यांनी ही धाडसी कारवाई केली. आरोपीकडून गावठी ठासणीची बंदूक, दारूगोळा, हेड टॉर्च आणि ठार केलेला साळिंदर जप्त करण्यात आला.
दरम्यान, ही कारवाई करून परतत असताना नेने येथील शासकीय जंगलातील शिरगावकर पॉईंट परिसरात काही संशयित फिरत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार तात्काळ धाव घेत पहाटे संशयितांचा पाठलाग करण्यात आला. यावेळी तिघांना पकडण्यात यश आले. त्यांच्या ताब्यातून एक नळी काडतूस बंदूक, ७ जिवंत काडतुसे, १० वापरलेली काडतुसे, दोन टॉर्च, तलवार तसेच शिकार केलेले पिशोरी कटिंदर जप्त करण्यात आले.
विशेष म्हणजे, या शिकाऱ्यांच्या हालचालींसाठी वापरण्यात येणारी कोल्हापूर पासिंगची आलिशान एमजी हेक्टर (MH09 GF 0014) कारही घटनास्थळावरून जप्त करण्यात आली आहे.
ही संपूर्ण कारवाई उपवनसंरक्षक (प्रा.) मिलीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे यांच्या नेतृत्वाखाली वनक्षेत्रपाल वैभव भिसे, वनपाल नामदेव चौगुले, म्हैबुब नायकवडे, सम्राट पाटील, पोलीस हवालदार गोरेश राणे, वनरक्षक रविंद्र पाटील, संग्राम पाटील, तानाजी चव्हाण, वासुदेव खोत, अनिकेत आवारे, अनिकेत देशमुख आणि आरआरटी पथकाने अत्यंत शिताफीने पार पाडली.
आंबोली हे पर्यटन आणि जैवविविधतेचे महत्त्वाचे केंद्र असल्याने पर्यटकांच्या नावाखाली सुरू असलेले शिकारीचे प्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा वनविभागाने दिला आहे. परिसरात संशयास्पद हालचाली आढळल्यास नागरिकांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

