कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑रोझरी इंग्लिश स्कूल मध्ये दहावीतील विशेष गुणवंतांचा गौरव.

*🛑रोझरी इंग्लिश स्कूल मध्ये दहावीतील विशेष गुणवंतांचा गौरव.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मालवण, दि- १८:-* मालवण शहरातल्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेमधून शैक्षणिक वर्ष २०२५ – २०२६ दरम्यान इयत्ता दहावीच्या परीक्षेतील विशेष गुणवंतांचा गौरव समारंभ, १६ जून २०२६ रोजी संपन्न झाला. प्रशालेचे मुख्याध्यापक रेवरंड फादर अन्थोनी डिसोज़ा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच मानद अतिथी रेवरंड फादर ऑल्वीन गोन्साल्वीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

रोझरी इंग्लिश स्कूलमधून साल २०२५ -२०२६ ह्या शालेय शैक्षणिक वर्षात ३९ विद्यार्थ्यांना डिस्टिंक्शन प्राप्त झाले असून ९ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी प्राप्त झाली आहे. यामध्ये कु. पार्थ उदय बागवे याने ९७. ४०% गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला. कु. मधुरा विक्रम परब हिने ९६% गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तृतीय क्रमांकावर कु. समर्थ विजय यादव व कु. वंशिका मनोज रावले या दोघांनी ९५. ८०% गुण मिळवून संयुक्तपणे तृतीय क्रमांक प्राप्त केला.

मान्यवरांच्या हस्ते विशेष गुणवतांचा त्यांच्या पालकांसमवेत शाल, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह व उपयुक्त भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. सर्व यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनींना उपयुक्त भेटवस्तू व पुष्प देत गौरविण्यात आले.

या दरम्यान,विद्यार्थी विद्यार्थिनींसाठीच्या विविध शालेय शिष्यवृत्तींचे वितरण करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रेवरंड फादर ऑल्वीन गोन्साल्वीस यांनी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले व पुढील सर्वांगीण वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या.

यावेळी मुख्याध्यापक रेवरंड फादर ॲन्थोनी डिसोज़ा यांनी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींच्या मेहनतीची प्रशंसा केली तसेच सर्व शिक्षकांच्या समर्पण व योगदानाविषयी विशेष आनंद व्यक्त केला.

शिक्षकांच्या वतीने,शिक्षिका ग्रॅमा आल्मेड़ा यांनी मनोगत व्यक्त केले. सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींच्या वतीने, कु.पार्थ उदय बागवे, कु. वंशिका मनोज रावले व कु. मधुरा विक्रम परब यांनी मनोगत व्यक्त करत प्रशाला व शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. पालकवर्गाच्या वतीने श्री. उदय बागवे व सौ. श्वेता विजय यादव यांनी मनोगत व्यक्त करताना रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेची शिस्त, शिक्षकांचे अहोरात्र समर्पण आणि संस्थेच्या मुलांसाठीच्या सर्वांगीण विकासाप्रती असलेल्या जाणीवांना अधोरेखित करत प्रशंसा केली.

या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका मारिया लुईस फर्नांडिस यांनी केले तर शिक्षिका सुजाता मुणगेकर यांनी सहसूत्रसंचालन केले शिक्षिका डायना डिसोज़ा यांनी आभार प्रदर्शन केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!