🛑जीवे मारण्याचा प्रयत्न आरोपातून तिघांची निर्दोष मुक्तता.
*🛑जीवे मारण्याचा प्रयत्न आरोपातून तिघांची निर्दोष मुक्तता.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- १८:-* जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्हयातील तिन्ही आरोपींची सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. १० ऑगस्ट २०२१ रोजी दाखल झालेल्या फिर्यादीवरून आरोपी विजय घाडीगावकर, सौ. अस्मिता विजय घाडीगावकर आणि अनिकेत घाडीगावकर यांच्याविरुद्ध आचरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपींतर्फे अॅड. उल्हास कुळकर्णी, अॅड. प्राची कुळकर्णी आणि अॅड. अमेय कुळकर्णी यांनी काम पाहिले.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपी विजय घाडीगावकर याच्याशी तिचा ५ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रेमविवाह झाला होता. आरोपी अस्मिता घाडीगावकर ही विजय घाडीगावकर यांची पहिली पत्नी असून अनिकेत घाडीगावकर हा त्यांचा मुलगा आहे. फिर्यादी व आरोपी यांच्यात दीड वर्षांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. त्यातून १० ऑगस्ट २०२१ रोजी फिर्यादी घरी झोपलेली असताना आरोपींनी संगनमताने तिचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीने केला होता. धक्काबुक्की, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद केले होते.
या प्रकरणी आरोपींना ११ ऑगस्ट २०२१ रोजी अटक झाली होती. त्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता झाली होती. या प्रकरणाची सुनावणी ओरोस येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. सुनावणी दरम्यान सरकार पक्षाला आरोप संशयांच्या पलीकडे सिद्ध करता आले नाहीत. सादर पुराव्यांतील त्रुटी व विसंगतींचा विचार करून न्यायालयाने आरोपींना संशयाचा फायदा देत सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

