कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑आजगावात मायनिंगच्या नावाखाली ड्रोन सर्व्हे; ग्रामस्थांचा संताप उसळला, संघर्षाच्या उंबरठ्यावरून परिस्थिती परतली!

*🛑आजगावात मायनिंगच्या नावाखाली ड्रोन सर्व्हे; ग्रामस्थांचा संताप उसळला, संघर्षाच्या उंबरठ्यावरून परिस्थिती परतली!*

 

*🛑सहकार क्षेत्रातील ‘त्या’ प्रभावशाली नेत्याचे नाव चर्चेत; ग्रामस्थांनी जेएसडब्ल्यूच्या पथकाला रोखले, संजू परबांच्या मध्यस्थीने टळला मोठा अनर्थ.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १६:-* आजगाव व दशक्रोशी परिसरात प्रस्तावित मायनिंग प्रकल्पासाठी सुरू असलेल्या ड्रोन सर्व्हेक्षणाने सोमवारी मोठे वादळ निर्माण केले. जेएसडब्ल्यू कंपनीच्या सर्वेक्षण पथकाला ग्रामस्थांनी थेट जाब विचारत विठोबा मंदिर परिसरात आणल्यानंतर परिसरातील वातावरण अक्षरशः पेटले. ग्रामस्थांचा संताप, सर्वेक्षण कर्मचाऱ्यांची धावपळ आणि पोलिसांचा वाढता बंदोबस्त यामुळे परिस्थिती कोणत्याही क्षणी नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागली होती.

“आमच्या जमिनी, आमची गावे आणि आमच्या भवितव्याचा निर्णय आमच्याशी चर्चा न करता कोण घेत आहे?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात होता. ड्रोन सर्व्हेक्षणामागे नेमके कोणाचे हितसंबंध आहेत, याबाबतही नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, संघर्षाची ठिणगी भडकण्याआधीच शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची सूत्रे आपल्या हाती घेतली. संतप्त ग्रामस्थांचे म्हणणे संयमाने ऐकून घेत त्यांनी सर्वेक्षण कर्मचाऱ्यांनाही भूमिका मांडण्याची संधी दिली. त्याचवेळी पोलीस प्रशासनाशी समन्वय साधत संवादाचा मार्ग खुला केल्याने तणाव निवळण्यास मदत झाली.

स्थानिक कायदेतज्ज्ञ ॲड. स्वप्निल प्रभू आजगावकर यांच्या सहकार्याने ग्रामस्थांच्या भावना व शंका वरिष्ठ पातळीवर पोहोचविण्यात आल्या. यावेळी आमदार दीपक केसरकर व आमदार निलेश राणे यांच्याशी संपर्क साधून घडामोडींची माहिती देण्यात आली. त्यामुळे संघर्षाऐवजी चर्चेचा मार्ग स्वीकारला गेला.

या सर्व प्रकरणात जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील एका प्रभावशाली नेत्याचे नाव ग्रामस्थांकडून वारंवार घेतले जात असल्याने संशयाचे वातावरण अधिक गडद झाले आहे. मायनिंगच्या हालचालींना राजकीय वा आर्थिक पाठबळ आहे का? संबंधित नेत्याची नेमकी भूमिका काय? असे प्रश्न आता उघडपणे विचारले जाऊ लागले आहेत.

आजगाव आणि दशक्रोशीतील ग्रामस्थांनी दिलेला एकजुटीचा संदेश स्पष्ट आहे – विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या भावना डावलून कोणताही निर्णय चालणार नाही. ग्रामस्थांच्या भावना, प्रशासनाची जबाबदारी आणि कायदा-सुव्यवस्थेचा समतोल राखत संजू परब यांनी साधलेला सुवर्णमध्य हा दिवसातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरला. त्यामुळे संभाव्य संघर्ष टळला असला तरी मायनिंगच्या मुद्द्यावरून आता पुढील काळात संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

मायनिंगचा प्रश्न केवळ ड्रोन सर्व्हेपुरता मर्यादित नसून तो आता गावकऱ्यांच्या अस्तित्व, पर्यावरण आणि भविष्यासंदर्भातील लढाई बनत चालल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!