कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील इंडोस्कोपी मशीन वारंवार नादुरुस्त; गोरगरीब रुग्णांना खाजगी दवाखान्यांचा आर्थिक फटका!

*🛑सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील इंडोस्कोपी मशीन वारंवार नादुरुस्त; गोरगरीब रुग्णांना खाजगी दवाखान्यांचा आर्थिक फटका!*

 

*🛑प्रत्येक तपासणीसाठी ५ हजारांपर्यंत खर्च; नवीन इंडोस्कोपी मशीनची तातडीने उपलब्ध करावी – राजू मसुरकर*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १६:-* सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील इंडोस्कोपी मशीन वारंवार नादुरुस्त होत असल्याने गोरगरीब रुग्णांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा गंभीर मुद्दा पुढे आला आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी ही बाब जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांच्या निदर्शनास आणून दिली.

याबाबत अधिक माहिती घेतली असता, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने इंडोस्कोपी मशीन दुरुस्तीसाठी जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. श्रीपाद पाटील यांना लेखी पत्र देऊन मागणी केल्याचे समोर आले. मात्र, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत या यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित वार्षिक देखभाल करार (AMC) कंपनीमार्फत पार पाडणे अपेक्षित असताना त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अशी परिस्थिती वारंवार उद्भवत असल्याचे मसुरकर यांनी सांगितले.

सध्या इंडोस्कोपी मशीन बंद असल्यामुळे रुग्णांना खाजगी रुग्णालयांमध्ये तपासणी करावी लागत असून त्यासाठी सुमारे ५ हजार रुपयांपर्यंत खर्च करावा लागत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी हा खर्च परवडणारा नसल्याने अनेक रुग्णांना उपचारांपासून वंचित राहण्याची वेळ येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपलब्ध निधीतून इंडोस्कोपी मशीनची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी मसुरकर यांनी केली आहे. तसेच वारंवार बिघाड होणाऱ्या मशीनवर अवलंबून राहण्याऐवजी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी नवीन अत्याधुनिक इंडोस्कोपी मशीन उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा रुग्णालयाकडे प्रस्ताव पाठवावा, अशीही त्यांनी मागणी केली.

जिल्हा नियोजन समिती निधी अथवा सीएसआर निधीतून नवीन मशीन उपलब्ध करून देण्याचा पाठपुरावा करावा व त्यासाठी तातडीने लेखी प्रस्ताव पाठविण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

गोरगरीब रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित हा प्रश्न असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा याबाबत जनआंदोलन छेडण्याचा इशाराही राजू मसुरकर यांनी दिला आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!