🛑नडगिवेतील चोरीत दागिन्यांसह रोकड लंपास.
*🛑नडगिवेतील चोरीत दागिन्यांसह रोकड लंपास.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- ११:-* नडगिवे गावातील धुरीभाटलेवाडीमध्ये एकाच रात्री तब्बल सहा बंद घरांना लक्ष्य करून घरफोडी केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली होती. यात सुमारे १० हजार रुपयांची रोख रक्कम, सोन्याचे पेंडंट तसेच चांदीच्या मौल्यवान वस्तूंवर चोरट्यांनी डल्ला मारला असल्याचे समजते. याप्रकरणी नडगिवे गावचे पोलीस पाटील जितेंद्र चंद्रकांत मणयार यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या भागातील अनेक घरे वर्षभर बंदच असतात. याच गोष्टीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी ही घरफोडी केली. घरफोडीदरम्यान चोरट्यांनी वाडीतील मोहन सखाराम मणयार, संदीप पांडुरंग मांजरेकर, भास्कर शंकर राणे, रवींद्र वासुदेव मांजरेकर, शंकर सीताराम आंबेकर आणि अमोल सदाशिव मयेकर अशा एकूण ६ नागरिकांच्या बंद घरांना लक्ष्य केले होते.
चोरट्यांनी या सर्व घरांचे मुख्य दरवाजे, गेट तसेच खिडक्यांचे कोयंडे तोडून आत प्रवेश केला होता. कपाटे फोडून सर्व सामान अस्ताव्यस्त फेकून दिले होते. चोरट्यांनी संदीप मांजरेकर यांच्या घरातील रोख १० हजार रुपये, सोन्याचे पेंडंट, तर रवींद्र मांजरेकर यांच्या घराच्या देव्हाऱ्यातील चांदीच्या मौल्यवान वस्तू लांबविल्याचे समजते. मात्र, अन्य घरांचे मालक मुंबईवरून गावात आले नसल्याने, त्यांच्या घरातून नेमकी किती रोकड अथवा मुद्देमाल चोरीला गेला आहे, हे समजू शकलेले नाही. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, तोंडाला रुमाल बांधलेले आणि हातामध्ये ग्लोव्हज घातलेले सुमारे सहा संशयित मध्यरात्री परिसरात वावरताना दिसून आले होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

