कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलच्या दणक्यानंतर एस. टी. प्रशासन खडबडून जागे…
◼️गेली कित्येक वर्ष बंद असलेला विद्युत पुरवठा केला पूर्ववत-आंबोली बस स्थानक झाले प्रकाशमय
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : चौंडू (संजय) पाटील
🎴आंबोली : दि. ११ प्रति महाबळेश्वर समजल्या जाणाऱ्या आंबोली एस. टी. बस स्थानकाची दुरावस्था यावर स्थानिक ग्रामस्थ व कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलने वारंवार आवाज उठविल्यानंतर, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी या स्थानकाला भेट देऊन स्थानकातील त्रुटी दूर करण्याचे आदेश दिले होते. मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल नाही सहाय्यक जनसंपर्क अधिकारी यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता या आशया खाली वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर एस. टी. प्रशासन खडबडून जागे झाले व गेले कित्येक वर्ष काळोखात असलेले आंबोली बस स्थानक विद्युत रोषणाईने उजळून निघाले.
याबाबत आमचे कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलच्या आंबोली प्रतिनिधी चौंडू(संजय) पाटील यांनी वस्तुस्थितिनिष्ठ लिखाण करून अधिकाऱ्यांना जाग आणली एवढेच नाही, तर वारंवार दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांना जाब विचारला.
अखेर झोपी गेलेले एसटी महामंडळाचे अधिकारी जागे झालेत व गेली कित्येक वर्ष बंद असलेले फॅन ,ट्यूब लाईट, एलईडी बल्ब, हॅलोजन ,पूर्व सुरू करून आंबोली बस स्थानक विद्युत रोषणाईने उजळून निघाले, याबद्दल प्रवासी वर्गाने कोकण ब्रेकिंग न्यूज चॅनल चे आभार मानले व अधिकाऱ्यांनाही धन्यवाद दिले आहेत.
🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻
http://kokanlivebreaking.live
🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻
https://t.me/kokanlive
🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻
https://twitter.com/livekokan
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला


ज्या महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी ५० हजारी मनसबदार आहेत त्यांच्याकडून कामाची अपेक्षा करणे कठीणच आहे