कोकणमहाराष्ट्रवैभववाडीसिंधुदुर्ग

🛑उंबर्डे रस्ताप्रश्नीचे उपोषण स्थगित.

*🛑उंबर्डे रस्ताप्रश्नीचे उपोषण स्थगित.*

 

*🛑आठ दिवसांत तोडगा न निघाल्यास २३ जूनपासून पुन्हा आंदोलन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वैभववाडी, दि- ०९:-* वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे सुतारवाडी येथील रस्त्याच्या प्रश्नासाठी ग्रामस्थांनी पंचायत समितीसमोर सुरू केलेले उपोषण उपसभापती साची कोलते व पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर सोमवारी सायंकाळी मागे घेण्यात आले. मात्र, आठ दिवसांच्या आत रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही, तर २३ जूनपासून पुन्हा उपोषण छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

उंबर्डे सुतारवाडीकडे जाणारा रस्ता एका व्यक्तीने अडविल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत असून हा रस्ता तातडीने खुला करण्याची त्यांची मागणी आहे. यापूर्वीही याच ग्रामस्थांनी उंबर्डे ग्रामपंचायतीसमोर उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र, त्यानंतरही प्रश्न न सुटल्याने सोमवारी सकाळपासून पंचायत समिती, वैभववाडी कार्यालयासमोर सुप्रसाद पांचाळ, विजय पांचाळ, शशिकांत पांचाळ आणि शुभम पांचाळ यांनी आमरण उपोषण सुरू केले. उपोषणकर्त्यांची समजूत काढण्यासाठी सहाय्यक गटविकास अधिकारी स्नेहा माने आणि कक्ष अधिकारी बाबू देसाई यांनी चर्चा केली. मात्र, ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. दुपारनंतर उपसभापती साची कोलते आणि सदस्य मंगेश लोके यांनी उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष उंबर्डे येथे जाऊन रस्त्याची पाहणी करण्यात आली.

यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी स्नेहा माने, सरपंच वैभवी दळवी, विस्तार अधिकारी प्रकाश अडुळकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांनी आठ दिवसांच्या आत सभापती, गटविकास अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांची उंबर्डे ग्रामपंचायतीत संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनाला मान देत ग्रामस्थांनी उपोषण स्थगित केले. मात्र, दिलेल्या मुदतीत प्रश्न निकाली न निघाल्यास २३ जून रोजी पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!