🛑“वीज वितरणाचा भोंगळ कारभार;जिल्हावासीयांचा संताप अनावर!”
*🛑“वीज वितरणाचा भोंगळ कारभार;जिल्हावासीयांचा संताप अनावर!”*
*🛑पालकमंत्र्यांच्या आदेशालाही अधिकाऱ्यांकडून केराची टोपली; मनसे जिल्हाध्यक्ष ॲड.अनिल केसरकर यांची घणाघाती टीका*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्ग, दि- २९:-* प्रचंड वाढलेल्या उष्म्यामुळे आधीच नागरिक हैराण झाले असताना आता वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे जिल्हावासीयांचे जगणे अक्षरशः असह्य बनले आहे. दिवस-रात्र कोणतेही ठोस कारण नसताना वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक, व्यापारी, छोटे उद्योजक तसेच विद्यार्थी यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजेमुळे अनेकांचे आर्थिक नुकसानही होत असून वीज वितरण विभागाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढला असून उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत अखंडित वीजपुरवठा आवश्यक असताना महावितरणच्या अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा उघड होत असल्याची टीका होत आहे. विशेष म्हणजे पावसाळ्याला अद्याप सुरुवातही झालेली नसताना ही अवस्था असेल, तर मुसळधार पावसाच्या काळात परिस्थिती किती बिकट होईल, याची चिंता नागरिक व्यक्त करत आहेत.
काही दिवसांपूर्वी पालकमंत्री नितेश राणे यांनी वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कडक कारवाईचा इशाराही दिला होता. मात्र त्या बैठकीनंतरही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली दिसत नसल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी केला आहे.
“दिवसभरात दहा ते पंधरा वेळा कोणतेही नैसर्गिक कारण नसताना वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांचा संयम सुटत चालला आहे. पालकमंत्र्यांच्या आदेशालाही अधिकारी गांभीर्याने घेत नसतील, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे,” अशी घणाघाती टीका ॲड. केसरकर यांनी केली.
यासोबतच त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी तसेच जिल्ह्यातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज समस्येवर कायमस्वरूपी ठोस उपाययोजना कराव्यात,अशी मागणी केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

