🛑पोटाची खळगी भरण्यासाठी रोजची झुंज…; वृद्ध आजींच्या संघर्षमय जीवनाने डोळे पाणावले.
*🛑पोटाची खळगी भरण्यासाठी रोजची झुंज…; वृद्ध आजींच्या संघर्षमय जीवनाने डोळे पाणावले.*
*🛑हिवाळा, उन्हाळा, पावसाची पर्वा नाही; दोन वेळच्या भाकरीसाठी सावंतवाडी बाजारपेठेत वृद्ध महिलांची धडपड.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि २०:-* “जगणं फार कठीण आहे…” हे वाक्य आपण सहज बोलून जातो. मात्र खऱ्या अर्थाने जीवनाशी रोज संघर्ष करणाऱ्या त्या वृद्ध आजींना पाहिलं, की आपल्या आयुष्यातील अनेक तक्रारी क्षणात लहान वाटू लागतात. सावंतवाडी बाजारपेठेत दररोज सकाळी सात वाजल्यापासून ग्रामीण भागातील अनेक महिला आणि वृद्ध महिला आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी छोट्या-मोठ्या वस्तू घेऊन बसतात.
हिवाळा असो, पावसाळा असो किंवा कडक उन्हाळा… कोणत्याही ऋतूची पर्वा न करता या आजी आपलं छोटंसं सामान मांडून ग्राहकांची वाट पाहत बसलेल्या दिसतात. त्यांच्या समोर हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच चार वस्तू असतात. त्या वस्तू विकल्या गेल्या तरच दिवसाचा उदरनिर्वाह होतो. दिवस संपेपर्यंत त्या बसून राहतात आणि अखेर हातात पडतात ते फक्त शंभर-दोनशे रुपये. पण त्याच पैशांत त्या आपल्या जगण्याची लढाई पुढे नेत असतात.
या वृद्ध महिलांनाही आजार आहेत, मनात चिंता आहेत, घरची काळजी आहे, आयुष्याचे अनेक प्रश्न आहेत. तरीही थकलेल्या शरीराने त्या प्रत्येक संकटाला सामोऱ्या जात जगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या निरागस चेहऱ्याकडे आणि संघर्षमय जीवनाकडे क्षणभर पाहिलं, की आपल्याला आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतं.
आज सोशल मीडिया आणि टीव्हीवर अनेकदा आपण पाहतो, की शहरांमध्ये छोटा व्यवसाय करून जगणाऱ्या गरीब विक्रेत्यांवर पालिकेच्या कारवाया होतात. अनेकांचं संसाराचं साधन एका क्षणात उद्ध्वस्त होतं. मात्र तरीही हे लोक हार मानत नाहीत. कष्ट करत पुन्हा उभं राहतात.
याच भावना व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव म्हणाले, “खरंच या जगात मरण खूप सोपं आहे, पण जगणं फार कठीण आहे. अशा संघर्षमय जीवन जगणाऱ्या वृद्ध आजींकडे पाहिलं की आयुष्याचा खरा अर्थ समजतो. कधीकाळी मी देखील या व्यवस्थेचा बळी ठरलो होतो. मात्र समाजातील चांगल्या लोकांच्या आशीर्वादामुळे पुन्हा उभा राहिलो.”
तसेच त्यांनी पुढे सांगितले की, “प्रामाणिकपणे छोटा व्यवसाय करून जीवन जगणाऱ्या या कष्टकरी, निराधार वृद्ध महिलांसाठी आमची सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान भविष्यात आधारवड ठरेल. त्यांच्या आयुष्यात सावली निर्माण करण्यासाठी आम्ही कायम त्यांच्या पाठीशी राहू.”
सावंतवाडी बाजारपेठेतील या वृद्ध आजींचा संघर्ष आजच्या समाजाला माणुसकीची जाणीव करून देणारा आहे. त्यांच्या कष्टाला आणि जिद्दीला सलाम करण्याचीच भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

