कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑देवस्थानात धुडगूस, बांदा पोलिसांची अरेरावी; सरपंचांना न्यायाऐवजी ‘मर्डर’चा सल्ला?

*🛑देवस्थानात धुडगूस, बांदा पोलिसांची अरेरावी; सरपंचांना न्यायाऐवजी ‘मर्डर’चा सल्ला?*

 

*🛑कास देवस्थान प्रकरणाने सिंधुदुर्ग हादरला;पोलीस निरीक्षकांच्या कथित वक्तव्यामुळे संतापाची लाट*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- २९:-* देवस्थान म्हणजे श्रद्धा, शांतता आणि न्यायाचे प्रतीक. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कास गावातील देवस्थानात घडलेल्या प्रकाराने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. देवस्थान समितीच्या कार्यक्रमात घुसून काही व्यक्तींनी गोंधळ घालत टेबल उडवणे, देवस्थान समितीचा फलक फाडणे आणि उपस्थितांशी हुज्जत घालणे, हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असल्याची भावना व्यक्त होत आहे.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीचे अध्यक्ष तथा कास गावचे सरपंच प्रवीण पंडित यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. विशेष म्हणजे या गोंधळात सहभागी झालेल्यांपैकी एक व्यक्ती गोव्यातील पोलीस दलात कार्यरत असल्याची चर्चा असून, दुसरा दारू व्यवसायाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. कायद्याचे रक्षण

करणाऱ्यांकडूनच लोकप्रतिनिधींवर हात उचलला जात असल्याचा आरोप होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

*“मर्डर करून या…” — बांदा पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह*

या संपूर्ण प्रकरणात बांदा पोलीस स्टेशनच्या संबंधित पोलीस निरीक्षकांच्या कथित वक्तव्याने वाद अधिक चिघळला आहे. जखमी अवस्थेत तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या सरपंचांना आणि देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांना “तुम्ही मर्डर करून या, मग बघतो काय करायचं ते,” असे उत्तर देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

जर हा आरोप खरा असेल, तर तो पोलीस दलाच्या प्रतिमेला काळिमा फासणारा असल्याचे मत व्यक्त होत आहे. कायद्याचे पालन करवून घेण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारची भाषा वापरली जात असल्यास सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कोणाकडे पाहायचे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

*खाकी वर्दीचा धाक की दादागिरी?*

स्थानिक नागरिकांच्या मते, गुन्हेगारांवर कारवाई करण्याऐवजी तक्रारदारांनाच दमदाटी करण्याची प्रवृत्ती वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. लोकप्रतिनिधी आणि सरपंचांसमोरच जर पोलिसांची अरेरावी होत असेल, तर सामान्य जनतेची अवस्था काय असेल, अशी चर्चा आता गावागावात सुरू झाली आहे.

या प्रकरणाचा कथित व्हिडिओ समोर आल्याने संपूर्ण घटना अधिक चर्चेत आली आहे. व्हिडिओतील दृश्यांची चौकशी करून सत्य बाहेर आणावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

*गृहखात्याकडून कठोर कारवाईची मागणी*

देवस्थानात गोंधळ घालणाऱ्यांवर, लोकप्रतिनिधींवर हल्ला करणाऱ्यांवर आणि पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

सिंधुदुर्ग हा शांत, सुसंस्कृत आणि कायद्याचा आदर करणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे अशा घटनांमुळे जिल्ह्याची प्रतिमा मलीन होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. गृहखात्याने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करावी, अन्यथा जनतेच्या असंतोषाचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!