कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑उत्खनन प्रकरणी दोडामार्ग तहसीलदार, पीआयवर गंभीर आरोप; “नार्को टेस्ट करा, खरी नावे बाहेर येतील” – संजू परब

*🛑उत्खनन प्रकरणी दोडामार्ग तहसीलदार, पीआयवर गंभीर आरोप; “नार्को टेस्ट करा, खरी नावे बाहेर येतील” – संजू परब*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २९:-* दोडामार्ग तालुक्यात सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर उत्खनन प्रकरणावरून शिवसेना जिल्हाध्यक्ष संजू परब यांनी महसूल व पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप करत जोरदार हल्लाबोल केला. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी दोडामार्ग तहसीलदार व संबंधित पोलीस निरीक्षक (पीआय) यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली.

“दोडामार्ग तहसीलदार आणि पीआय यांची नार्को टेस्ट केली तर या प्रकरणातील खरी नावे बाहेर येतील. उत्खननाच्या मागे नेमके कोण आहेत, मालक कोण आहे, किती लोक या रॅकेटमध्ये सहभागी आहेत, याची संपूर्ण माहिती त्यांच्या चौकशीतून समोर येईल,” असा गंभीर आरोप परब यांनी केला.

तसेच संबंधित उत्खननासाठी तहसीलदार व पीआय यांनी तब्बल एक महिन्याची मूक संमती दिल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू राहिले आणि प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, असे ते म्हणाले.

दरम्यान, या प्रकरणाबाबत एमआयडीसी प्रशासनाकडे विचारणा करण्यात आली असता, “उत्खनन अथवा कोणतेही काम करण्यास आमच्याकडून कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही,” असे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याचेही परब यांनी सांगितले. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात अधिक संशय निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.

 

दोडामार्ग तालुकाध्यक्ष व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर हा प्रकार समोर आल्याचा दावा करण्यात आला. स्थानिकांकडून सातत्याने तक्रारी होत असूनही महसूल व पोलीस प्रशासनाने कारवाई न केल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला.

उत्खननामुळे पर्यावरणाची हानी होत असल्याचा मुद्दाही पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही संजू परब यांनी दिला.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!