कोकण

मंगळवार सकाळपासून घाट रस्ता दुचाकी व तीन आसनी रिक्षांसाठी खुला होणार

 

मळगांव घाटीतील कोसळलेल्या ब्रिटीशकालीन मोरीचे बांधकाम युद्धपातळीवर सुरु असून अंतिम टप्प्यात आले आहे. रविवारी रात्री मोरीच्या पाईपवर काँक्रिट घातल्यानंतर सोमवारी भराव व काँक्रिट घातल्यानंतर सोमवारी सायंकाळी किव्हा मंगळवार सकाळपासुन हा घाट रस्ता दुचाकी व तीन आसनी रिक्षांसाठी खुला होणार असल्याची माहिती सार्वजनिक, बांधकामचे उपकार्यकारी अभियंता अनिल आवटी यांनी दिली
गेल्या सोमवारपासून आठवडाभर या मोरीचे खोदकाम व बांधकाम अहोरात्र सुरू आहे. पावसाचे प्रमाण वाढल्याने मोरीच्या बांधकामास व्यत्यय येत होता. ऐन पावसाळ्यात या मोरीचे बांधकाम करणे आव्हाात्मक होते. या मोरीच्या पायाचे बांधकाम सुरू असताना एकदा काँक्रिट पावसाच्या पाण्याबरोबर वाहूनही गेले होते. दहा मीटर उंचीच्या आणि लांबी १२ मीटर लांबीच्या या मोरीला १२०० मिलिमीटरचे एम् पी ३ टाईपच्या तीन पाईपच्या दोन लाईन रविवारी बसविण्यात आल्या आहेत.
दरम्यान याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अनिल आवटी यांच्याशी संपर्क साधला असता पावसाने उसंत घेतल्यास या मोरीच्या बांधकामास गती मिळणार आहे. त्यामुळे सोमवार सायंकाळी किव्हा मंगळवार सकाळपासुन हा घाट रस्ता दुचाकी व रिक्षासाठी सुरू होणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!