कोकणमहाराष्ट्रमुंबई

🛑कोकणातील काजू उत्पादकांवर अन्याय?; काजू बाजार समिती कोल्हापुरात स्थापन करण्यास तीव्र विरोध.

*🛑कोकणातील काजू उत्पादकांवर अन्याय?; काजू बाजार समिती कोल्हापुरात स्थापन करण्यास तीव्र विरोध.*

 

*🛑“काजू बोर्ड, निर्यात केंद्र आणि प्रक्रिया प्रकल्प सिंधुदुर्ग-रत्नागिरीतच व्हावेत” — मराठा क्रांती मोर्चा महा मुंबईची मागणी*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मुंबई, दि- २५:-* राज्य सरकारने काजू बाजार समिती, काजू निर्यात केंद्र, आधुनिक नर्सरी, प्रक्रिया प्रकल्प तसेच “सेंटर फॉर एक्सलन्स” कोल्हापूर येथे उभारण्याच्या निर्णयाला मराठा क्रांती मोर्चा महा मुंबईकडून तीव्र विरोध करण्यात आला आहे. कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक काजू उत्पादन होत असताना हे प्रकल्प कोल्हापुरात नेणे म्हणजे लाखो काजू उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.

मे २०२२ मध्ये महाराष्ट्र राज्यात काजू बोर्डाची स्थापना करण्यात आली. मात्र काजू उत्पादनाशी थेट संबंध असलेल्या कोकणातील जिल्ह्यांकडे दुर्लक्ष करून बाजार समिती व संबंधित प्रकल्प कोल्हापुरात उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

मराठा क्रांती मोर्चा महा मुंबईने स्पष्ट केले की, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हे हे राज्यातील प्रमुख काजू उत्पादक जिल्हे असून हजारो शेतकरी काजू व्यवसायावर अवलंबून आहेत. एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ८० हजार हेक्टर क्षेत्र काजू लागवडीखाली असून या उद्योगामुळे कोकणातील अर्थचक्र गतिमान राहते.

काजू बाजार समिती, प्रक्रिया उद्योग, निर्यात केंद्र आणि संशोधन प्रकल्प हे उत्पादन क्षेत्रातच उभारले गेले तर शेतकऱ्यांना थेट फायदा होईल, रोजगारनिर्मिती वाढेल आणि निर्यात व्यवस्थाही अधिक सक्षम होईल, असे मत मोर्चाकडून व्यक्त करण्यात आले.

राज्य सरकारचे सध्याचे धोरण हे कोकणातील काजू उत्पादकांच्या विरोधातील असल्याचा आरोप करत, तात्काळ निर्णय बदलून काजू बाजार समिती व सर्व संबंधित प्रकल्प सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरी येथे स्थापन करावेत, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

“निर्णय बदलला नाही तर मुंबईत तीव्र आंदोलन”

सरकारने निर्णय बदलला नाही तर येत्या काळात काजू व आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने मुंबईत एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही मराठा क्रांती मोर्चा महा मुंबईकडून देण्यात आला आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!