🛑खैराच्या टेम्पोवर धाड… आणि सह्याद्रीच्या लुटीवर मौन ?
*🛑खैराच्या टेम्पोवर धाड… आणि सह्याद्रीच्या लुटीवर मौन ?*
*🛑वनविभागाच्या दुटप्पी कारभारामुळे सामान्य शेतकरी आरोपी,तर जंगलमाफिया मोकाट.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ संपादकीय : सीताराम गावडे*
*🎴सिंधुदुर्ग, दि- २५:-* सावंतवाडीतील वनविभागाने खैर लाकूड वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा थरारक पाठलाग करून मोठी कारवाई केल्याचे गाजत आहे. टेम्पो अडवला, चालक फरार झाला, लाखोंचा मुद्देमाल जप्त झाला… आणि लगेच अधिकाऱ्यांच्या “शौर्या”च्या बातम्या झळकू लागल्या. पण प्रश्न असा आहे की, हा सगळा थाट फक्त सामान्य माणसांवरच का दाखवला जातो? सह्याद्रीच्या कुशीत दिवसाढवळ्या सुरू असलेल्या मोठ्या जंगललुटीसमोर हेच अधिकारी एवढे मुके आणि बहिरे का होतात? हा आमचा सवाल आहे आणि याचे उत्तर वनविभागाला द्यावेच लागेल.
आज एका गरीब शेतकऱ्याने आपल्या शेतातील खैर तोडून उपजीविकेसाठी वाहतूक केली तर त्याच्या मागे चित्रपटातील दृश्यासारखा पाठलाग केला जातो. जणू काही एखादा आंतरराष्ट्रीय गुन्हेगार पकडला आहे, अशा थाटात प्रसिद्धीपत्रके काढली जातात. पण दुसरीकडे सह्याद्री पट्ट्यात हजारो झाडांची कत्तल होत असताना वनविभागाची गाडी त्या दिशेने फिरकतही नाही. कारण तिथे गरीब शेतकरी नसतो… तिथे पैशाची ताकद असते, राजकीय वरदहस्त असतो आणि हप्तेखोरीचे जाळे असते.
*सह्याद्रीची कत्तल करणाऱ्यांवर कारवाई का नाही?*
दोडामार्ग, सासोली, तळवडे, आंबोली परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर जंगल साफ करण्यात आले. डोंगर पोखरले गेले. परप्रांतीयांच्या माध्यमातून झाडांची अवैध कत्तल झाली. काही ठिकाणी अननस शेतीच्या नावाखाली सह्याद्रीचा हिरवा श्वासच संपवण्याचा उद्योग सुरू आहे. स्थानिक ग्रामस्थ अनेकदा ओरडले, तक्रारी दिल्या, पुरावे दिले… पण वनविभागाने किती मोठ्या कारवाया केल्या?
जेव्हा दि ओरीजीन सासोली येथील दि ओरीजिन कंपन्यांनी हजारो झाडे तोडली, तेव्हा वनअधिकाऱ्यांच्या हाताला लकवा मारला होता का? केरळीयन टोळ्यांनी डोंगर खालसा करून जंगलात गांजा लागवडीचे साम्राज्य उभे केले, सापांच्या विषाची तस्करी सुरू झाली, तेव्हा या विभागाचे रडार बंद झाले होते का? सामान्य माणसांच्या टेम्पोचा पाठलाग करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्या वेळी जंगलात जाण्याची हिंमत का झाली नाही?
*गरीब शेतकरीच सापडतो कारण तो ‘सॉफ्ट टार्गेट’*
वनविभागाच्या कारवायांचे एक ठरलेले सूत्र आहे. गरीब शेतकरी, मजूर, गावकरी किंवा छोटा व्यापारी दिसला की त्याच्यावर धाड टाका. कारण तो ना कोर्टात मोठे वकील उभे करू शकतो, ना राजकीय दबाव आणू शकतो. त्यामुळे अशा कारवायांत प्रसिद्धीही मिळते आणि “काम केले” असा अहवालही तयार होतो.
खैराचे झाड हे ग्रामीण भागातील अनेकांसाठी आर्थिक आधार असते. काही लोक शेतीतील किंवा स्वतःच्या मालकीच्या जागेतील खैर विकून संसार चालवतात. नियम मोडले असतील तर कारवाई व्हायलाच हवी; पण ती करताना न्यायाचा तोल हवा. लाखो झाडे तोडणाऱ्यांवर मौन आणि दोन-चार ओंडके वाहून नेणाऱ्यांवर धडक मोहीम, हा न्याय नव्हे तर दुटप्पीपणा आहे.
*वनविभागाच्या हप्तेखोरीच्या चर्चांना खतपाणी*
सह्याद्री परिसरात आज सर्वसामान्य लोकांमध्ये एक उघड चर्चा आहे — “मोठ्या जंगलमाफियांकडून हप्ते घेतले जातात आणि लहान माणसांवर कारवाई होते.” ही चर्चा विनाकारण निर्माण झालेली नाही. कारण लोकांनी अनेकदा मोठे ट्रक, रात्रीच्या अंधारात होणारी वाहतूक, डोंगर पोखरणारी यंत्रणा पाहिली आहे. एवढे सगळे सुरू असताना वनविभागाला काहीच दिसत नाही, हे जनतेला पटत नाही.
जर वनविभाग खरोखरच प्रामाणिक असेल, तर त्यांनी आतापर्यंत सह्याद्रीत झालेल्या मोठ्या वृक्षतोडीची श्वेतपत्रिका जाहीर करावी. किती झाडे तोडली गेली? कोणत्या कंपन्यांवर गुन्हे दाखल झाले? किती अधिकाऱ्यांवर चौकशी झाली? किती जमीन माफियांकडून जप्त झाली? हे आकडे जनतेसमोर मांडावेत. फक्त टेम्पो पकडून फोटोसेशन करणे म्हणजे जंगल वाचवणे नव्हे.
जंगल वाचवायचे की प्रसिद्धी मिळवायची?
वनविभागाचा मूळ उद्देश जंगल संवर्धन हा आहे. पण आज अनेक कारवाया या फक्त प्रसिद्धीसाठी केल्या जात असल्याचा आरोप होतो. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या धडक कारवाया दाखवून स्वतःची प्रतिमा रंगवली जाते; मात्र सह्याद्रीच्या मुळावर उठलेल्या मोठ्या रॅकेटवर हात घालण्याची हिंमत दाखवली जात नाही.
सह्याद्री ही कोकणाची जीवनरेखा आहे. इथली झाडे, डोंगर, पाण्याचे झरे आणि जैवविविधता संपली तर भविष्यात कोकण वाळवंट होईल. त्यामुळे खऱ्या अर्थाने कारवाई करायची असेल तर मोठ्या जंगलमाफियांना पकडा, डोंगर पोखरणाऱ्यांना तुरुंगात टाका, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा. अन्यथा सामान्य माणसांच्या टेम्पोवर धाड टाकून स्वतःला “जंगलरक्षक” म्हणवून घेण्यात काही अर्थ नाही.
जनतेच्या मनातील संताप वाढतोय
आज ग्रामीण भागातील लोकांच्या मनात वनविभागाविषयी प्रचंड संताप आहे. कारण त्यांना कायदा समान दिसत नाही. एकीकडे मोठे लोक जंगल गिळतात आणि दुसरीकडे गरीब माणूस आपल्या जगण्यासाठी झाड तोडतो म्हणून त्याच्यावर गुन्हे दाखल होतात. हा असमतोल थांबला नाही तर भविष्यात वनविभागाविरोधातील जनआक्रोश अधिक तीव्र होईल.
वनविभागाने आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. अन्यथा जनतेच्या नजरेत “जंगलरक्षक” नव्हे तर “जंगललुटीचे मुकदर्शक” अशीच त्यांची ओळख कायम राहील.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

