कोकणसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

तालुक्यातील कलाकारांच्या मानधन पेन्शन प्रस्तावांना मंजुरी- राघोजी सावंत

 

*उर्वरित कलाकारांना टप्प्याटप्प्याने पेन्शन योजनेचा लाभ मिळवून देणार*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :*शिवप्रसाद कोळंबेकर*

*🎴 सावंतवाडी :*
तालुक्यातील १३ जेष्ठ कलाकारांच्या मानधन ( पेंन्शन ) प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. उर्वरीत सर्व कलावंतांना लवकरच टप्याटप्याने लाभ मिळवुन देण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी माहिती कलावंत मानधन समिती सदस्य राघोजी सावंत यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कठीण काळात आपल्या घरच्या अडचणी बाजुला सारुन अनेक वर्ष निष्ठेने आपल्या अंगातील कलेचे सादरीकरण,प्रयोग करुन रसिक प्रेक्षकांची करमणुक केली. समाजाला योग्य दिशादर्शन व मार्गदर्शन केले. रसिक प्रेक्षकांना आपले दुःख व अडचणींचा विसर पाडावयास लावण्याबरोबर अभिजात कला जीवंत ठेवण्याचे पवित्र कार्य करणा-या व सावंतवाडी तालुक्यातील समाजाच्या जडणघडणीमध्ये सदैव सहभाग घेऊन आपले भरीव योगदान देणाऱ्या कलाकारांना शासनाच्या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा यासाठी सतत धडपड करणारे सावंतवाडी शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख तथा जिल्हास्तरीय ज्येष्ठ साहित्यिक व ज्येष्ठ कलावंत मानधन निवड समिती सदस्य केसरी येथील श्री राघोजी सावंत यांनी दिली.
मंगळवार दि.२ मार्च रोजी सिंधुदुर्ग नगरी मधील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या जि.प.भवन मधील दालनांत संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या सभेत प्राप्त झालेल्या २४ प्रस्तावामधुन ज्या कलाकारांनी परिपूर्ण प्रस्ताव सादर केले अशा १३ जेष्ठ कलावंतांच्या नावाची शिफारस करुन त्यांच्या प्रस्तावाना मंजुरी घेऊन त्यांना पेंन्शन योजनेचा लाभ मिळवुन दिला.
या मंजुरी मिळालेल्या लाभार्थीमध्ये श्री मधुकर कृष्णा कडव – किर्तनकार (आंबेगाव), श्री शिवराम महादेव सावंत – तबला वादक ( माजगांव ), श्री यशवंत सखाराम ठाकर – ठाकर कला (मळगांव), श्री गंगाराम हेमा सावंत – दशावतार (असनिये) ,श्री लवु आलगो जाधव – ताशावादक (कोलगांव ) , श्री विजय शंकर पावसकर – दशावतार ( कलंबिस्त) , श्री रघुनाथ आप्पा सावंत – दशावतार ( ओवळीये),श्री भिसाजी सोमा गावडे – तबला वादक (निरवडे) ,श्री प्रदीप भिकाजी नाईक – दशावतार ( असनिये ), श्री रत्नाकर महादेव सावंत – भजन (असनिये),श्री गजानन राघो तोरसकर – दशावतार ( आंबोली ),श्री सोमा बाळा कदम -ताशा वादक( नेमळे) , श्री श्रीकृष्ण आत्माराम भोगले – दशावतार ( मडुरा) या कलावंतांचा समावेश आहे.
या जिल्हास्तरीय निवड समितीमध्ये खासदार श्री विनायक राऊत, जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.श्री उदय सामंत , तत्कालीन गृह राज्यमंत्री , पालकमंत्री तथा सावंतवाडीचे आमदार श्री दिपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांनी माझ्या नावाची शिफारस करुन मला लाभार्थी निवडण्याचे अधिकार देऊन माझ्यावर विश्वास टाकला आहे तो समितीतील माझ्या सहका-यांच्या मदतीने सार्थकी ठरवेन असा विश्वास श्री राघोजी सावंत यांनी व्यक्त केला.
या योजने पासुन कोणताही कलाकार वंचित रहाणार नसल्याची हमी श्री राघोजी सावंत यांनी बोलतांना दिली. यावेळी सर्व कलाकारांनी श्री राघोजी सावंत यांचे शब्दसुमनाने आभार मानले.

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

  1. *🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
    _अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!