नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांचा आरोप, कुडाळच्या आमदारांकडुन कणकवलीची बदनामी…
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : ता. ८ शहरातील भूमिगत वीज वाहिन्यांसाठी आलेला ६ कोटीचा निधी मागे जाण्यामध्ये आमदार वैभव नाईक आणि शिवसेना नेते संदेश पारकर यांचा भ्रष्टाचार कारणीभूत आहे. असा आरोप नगराध्यक्ष समीर नलावडे आणि उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी आज केला. तसेच माहिती न घेता आमदार नाईक आणि त्यांचे सहकारी संदेश पारकर यांनी आरोप करू नयेत. तसेच चुकीचे आरोप करून कुडाळ मतदारसंघाच्या आमदारांनी कणकवलीची बदनामी थांबवावी असेही आवाहन नगराध्यक्ष- उपनगराध्यक्षांनी केले.
नगराध्यक्ष दालनात नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी नाईक, पारकर यांनी केलेल्या आरोप खोडून काढले. यावेळी नगरसेवक संजय कामतेकर, अभिजित मुसळे, महेश सावंत आदी उपस्थित होते.
श्री.नलावडे म्हणाले, सावंतवाडी, वेंगुर्ले प्रमाणेच कणकवली शहरात भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यासाठी केंद्र शासनाकडून निधी प्राप्त झाला होता. या वाहिन्या टाकण्यासाठी रस्ते खोदाई आणि दुरूस्तीसाठी कणकवली नगरपंचायतीने प्रतिमिटर ७६४.१४ रुपये असा दर निश्चित केला होता. हा दर इतर नगरपालिकांच्या तुलनेत सर्वांत कमी होता. त्यामुळे भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यात कोणतीच समस्या नव्हती. मात्र नाईक-पारकर यांच्या ॲडजेंस्टमेंटमुळे ठेकेदाराने वीज वाहिन्यांचे काम सुरू केले नाही. त्यानंतर आता नाईक आणि पारकर हे आम्ही ५००० रुपये प्रतिमिटर असा दर लावला म्हणून निधी मागे गेल्याचा खोटा आरोप करत आहेत.
कणकवली प्रमाणेच सावंतवाडी शहरासाठी आलेला भूमिगत वीज वाहिन्यांसाठीचा ११ कोटी रुपयांचा निधी मागे गेला आहे. त्यावेळी सावंतवाडी नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता होती. बबन साळगावकर हे नगराध्यक्ष ते दीपक केसरकर हे पालकमंत्री होते. सावंतवाडी नगरपालिकेने तर तब्बल २४०० रुपये प्रतिमिटर एवढा दर निश्चित केला होता. तरीही तेथे भूमिगत वीज वाहिन्यांचे काम सुरू झाले नाही. मात्र ही बाब शिवसेनेचे आमदार वैभव नाईक आणि शिवसेना नेते संदेश पारकर सोईस्कर रित्या लपवत आहेत. भूमीगत वीज वाहिन्या टाकण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनीच ठेकेदार आणले होते. मात्र ठेकेदार आणि त्यांच्यात ॲडजेस्टमेंट न झाल्याने निधी मागे गेला आहे. त्याचे खापर मात्र नाईक-पारकर हे आमच्यावर फोडू पाहत आहेत असाही आरोप नगराध्यक्ष समीर नलावडे आणि उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी केला.
🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.
🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕
🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵
थंड पेये-🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤
🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲
🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

