कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सिंधुदुर्गात पतसंस्थांचे पहिलेवहिले भव्य दोन दिवसीय अधिवेशन.

*🛑सिंधुदुर्गात पतसंस्थांचे पहिलेवहिले भव्य दोन दिवसीय अधिवेशन.*

 

*🛑आंबोलीत सहकार चळवळीचा महामेळावा; आर्थिक व्यवस्थापन, सायबर सुरक्षा आणि एआय तंत्रज्ञानावर होणार सखोल मार्गदर्शन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- १८:-* सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सहकार इतिहासात प्रथमच जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांचे भव्य दोन दिवसीय अधिवेशन आंबोली येथे संपन्न होत असून, या अधिवेशनामुळे सहकार क्षेत्रात नवचैतन्य निर्माण होणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकार कायद्यांतर्गत नोंदणीकृत नागरी, ग्रामीण बिगरशेती आणि पगारदार अशा सुमारे १५० पतसंस्थांचा सहभाग या अधिवेशनात अपेक्षित आहे. ही माहिती सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्री. सुनिल राऊळ यांनी दिली.

*५ कोटींपेक्षा अधिक भागभांडवल असलेल्या पतसंस्थांचा गौरव*

जिल्ह्यात उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन करत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक खेळते भागभांडवल उभे करणाऱ्या सहकारी पतसंस्थांचा या अधिवेशनात विशेष सन्मान करण्यात येणार आहे. गौरव प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन या संस्थांचा गौरव करण्यात येणार असून, उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी आमदार दिपक केसरकर, आमदार निलेश राणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत हेही उपस्थित राहणार आहेत.

*पतसंस्थांसाठी मार्गदर्शनाचा ज्ञानमेळावा*

या अधिवेशनात सहकारी पतसंस्थांच्या आर्थिक व्यवस्थापनापासून ते भविष्यातील आव्हानांपर्यंत विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. नव्याने लागू झालेल्या आदर्श उपविधींवर जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे मार्गदर्शन करणार असून, कर्ज वितरण आणि वसुलीतील अडचणींवर पुण्याचे आर. व्ही. यादव मार्गदर्शन करतील.

सायबर गुन्ह्यांचा वाढता धोका लक्षात घेऊन सायबर सुरक्षा विषयावर पुंडलिक सातोसे यांचे मार्गदर्शन होणार आहे. तसेच भविष्यात पतसंस्थांसमोर उभे राहणारे तांत्रिक आणि आर्थिक प्रश्न, एआय तंत्रज्ञानाचा प्रभाव आणि उपाययोजना यावर महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष अॅड. दिपक पटवर्धन विचार मांडणार आहेत.

*ताणतणाव व्यवस्थापन आणि योगाचे महत्त्व*

सहकार क्षेत्रातील पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरील वाढत्या ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर योगतज्ज्ञ अशोक देशमुख ताणतणाव व्यवस्थापनावर विशेष मार्गदर्शन करणार आहेत. या दोन दिवसांच्या अधिवेशनात चेअरमन, संचालक, व्यवस्थापक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून त्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाचा लाभ मिळणार आहे.

राज्यभरातील सहकार नेत्यांची उपस्थिती

*अधिवेशनाला राज्यातील सहकार चळवळीतील अनेक दिग्गज उपस्थित राहणार* महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ. शांतीलाल सिंगी, संचालक सुदर्शनराव भालेराव तसेच कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष गिरीश तुळपुळे यांची उपस्थिती अधिवेशनाचे आकर्षण ठरणार आहे.

*एआय, तंत्रज्ञान आणि पतसंस्थांचे भवितव्य*

संगणकीय तंत्रज्ञान, डिजिटल व्यवहार आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांच्या वाढत्या वापरामुळे पतसंस्थांसमोर निर्माण होणारी आव्हाने आणि संधी यावर विशेष चर्चा सत्र आयोजित करण्यात आले आहे. पतसंस्थांना अधिक सक्षम, पारदर्शक आणि विश्वासार्ह बनविण्यासाठी या अधिवेशनातून दिशा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

स्वागत कमानी, बॅनर आणि आर्थिक सहकार्याने अधिवेशनाला बळ.

अधिवेशन यशस्वी व्हावे यासाठी जिल्ह्यातील अनेक पतसंस्थांनी स्वागत कमानी, बॅनर तसेच आर्थिक सहकार्य दिले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह विविध संस्थांनी अधिवेशनासाठी मदतीचा हात पुढे केला असून, सहकार चळवळीतील एकात्मतेचे हे प्रतीक मानले जात आहे.

*“सर्व पतसंस्थांनी एकत्र येऊन अधिवेशन यशस्वी करावे”*

हे अधिवेशन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणार असून, जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन फेडरेशनचे अध्यक्ष श्री. सुनिल राऊळ यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!