कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑लोककलेच्या रंगमंचावर उगवलेला नवा तेजस्वी तारा.

*🛑लोककलेच्या रंगमंचावर उगवलेला नवा तेजस्वी तारा.*

 

*🛑युवा दशावतारी कलाकार साईल तळकटकर यांना ‘दशावतार कर्तृत्व भूषण पुरस्कार’ प्रदान.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

 

*🎴सावंतवाडी, दि- १८:-* परंपरेचा वारसा, साधनेची निष्ठा आणि कलेवर अपार प्रेम या त्रिसूत्रीच्या बळावर दशावतार लोककलेच्या रंगमंचावर अल्पावधीतच स्वतःची ठळक ओळख निर्माण करणारे मळगाव गावचे सुपुत्र, युवा दशावतारी कलाकार साईल आपा तळकटकर यांना ‘दशावतार कर्तृत्व भूषण पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. या सन्मानामुळे मळगावसह संपूर्ण दशावतार क्षेत्रात साईल यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

हा प्रतिष्ठेचा पुरस्कार शनिवार, १६ मे रोजी कराड येथील सौ. वेणूताई चव्हाण स्मारक नाट्य सभागृह (शिवाजी हाउसिंग सोसायटी) येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सन्मान सोहळ्याचे आयोजन राजधानी सेवा प्रतिष्ठान, अनुश्री फाउंडेशन आणि संत शिरोमणी तुकाराम महाराज शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

*दशावतार कलेसाठी केलेल्या निष्ठावंत कार्याची दखल*

दशावतार लोककलेच्या जतन, संवर्धन आणि प्रचारासाठी तसेच समाजहितासाठी साईल तळकटकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण, निष्ठावंत आणि प्रेरणादायी कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

*शालेय जीवनापासून रंगमंचाची ओढ*

साईल तळकटकर यांना अभिनयाची आवड शालेय जीवनापासूनच होती. शाळेतील नाटिकांमध्ये ते आवर्जून सहभागी होत असत. मळगाव येथील स्थानिक बाल दशावतार मंडळातून त्यांनी आपल्या कलाप्रवासाची सुरुवात केली. त्यानंतर बोर्डेकर दशावतार नाट्यमंडळ, माऊली दशावतार नाट्यमंडळ (डोंगरपाल), भूमिका लोककला दशावतार नाट्यमंडळ (मळगाव) आणि सावरेश्वर दशावतार नाट्यमंडळ (आवेरे) या विविध नामांकित मंडळांमधून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. सध्या ते सावरेश्वर दशावतार नाट्यमंडळात कार्यरत आहेत.

*विविध भूमिका, प्रभावी अभिनय*

दशावतारमध्ये त्यांनी राजा सत्यव्रत ही पहिली भूमिका साकारली. त्यानंतर कृष्ण, विष्णू, इंद्र, युवराज, राम, गंधर्व अशा अनेक महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी आतापर्यंत यशस्वीपणे साकारल्या आहेत. शेषात्मक लक्ष्मी नरसिंह या नाटकातील त्यांनी साकारलेली भगवान नरसिंह ची भुमिका सध्या विशेष गाजत आहे.

*गुरू, मार्गदर्शक आणि रसिकांचे ऋण*

पुरस्काराबद्दल बोलताना साईल तळकटकर म्हणाले, “रसिक प्रेक्षक, हितचिंतक आणि मार्गदर्शक यांचा आशीर्वाद आज मला या पुरस्काराच्या रूपाने मिळाला आहे. दशावतार क्षेत्रात आतापर्यंत केलेल्या कार्याची ही एक पोचपावती असून, हा सन्मान पुढील काळात ही कला अधिक जोमाने जोपासण्यासाठी प्रेरणा देणारा आहे.” ते पुढे म्हणाले, शारदा विद्यामंदिर, सावळवाडा येथील मुख्याध्यापक सावंत सर यांनी मला प्रथम रंगमंचावर उभे केले. ‘सर्कस’ ही छोटी नाटिका माझा पहिला प्रयोग होता. वकृत्व, कथाकथन व नाट्यस्पर्धांमधून त्यांनी मला घडवले. सरांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पारितोषिके मिळाली. पुढे शाळेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात आम्ही सर्वांनी दशावतार नाट्यप्रयोग सादर केला. तेव्हापासून दशावतार कलेची आवड निर्माण झाली. मळगाव येथील ज्येष्ठ रंगकर्मी संजय जोशी हे माझे दशावतारातील पहिले गुरू असून, मळेवाड येथील अजीत गाडगीळ यांचेही मौल्यवान मार्गदर्शन लाभले. या सर्वांचे त्यांनी ऋण व्यक्त केले.

*आदर्श आणि संघर्षाचा प्रवास*

दशावतार क्षेत्रात लोकराजा सुधीर कलिंगण हे माझे आदर्श आहेत. गावातील स्थानिक मंडळ सोडल्यावर बोर्डेकर दशावतार नाट्य मंडळमध्ये पहिली भुमिका केली. या मंडळांचे पखवाज वादक निलेश मांजरेकर, सिध्दार्थ मेस्त्री, संजय काळे, साईल लाड, कांता मेस्त्री, संजय पालकर, अशा प्रकारच्या अनेक कलाकारांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले. “दशावतार ही केवळ कला नसून ती माझी आवड आहे. या प्रवासात अनेक चढ-उतार पाहिले. मात्र रसिक प्रेक्षकांचे प्रेम आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम राहो,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!