कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑नवभारत’च्या २० शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द.

*🛑नवभारत’च्या २० शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴बांदा, दि- १८:-* थी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ (मुंबई) संचलित सात शाळांमध्ये करण्यात आलेल्या एकूण २० शिक्षकांच्या नियुक्त्या बेकायदेशीर ठरवत कोल्हापूर विभागाच्या शिक्षण उपसंचालकांनी या शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करत त्यांचा शालार्थ आयडी रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. त्यांनी आजवर घेतलेले वेतन अनुदान सुमारे ८ ते १० कोटी रुपये संस्थेकडून वसूल करण्याचे आणि तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांवर शिस्तभंगविषयक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

याबाबतची माहिती तक्रारदार प्रेमानंद नाडकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे. या प्रकरणाबाबत उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये रिट याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. उच्च न्यायालयाच्या १९ नोव्हेंबर २०२५ च्या निर्णयानुसार, शिक्षण उपसंचालक (कोल्हापूर) यांनी २७ जानेवारी २०२६ आणि ३० जानेवारी २०२६ रोजी सविस्तर सुनावणी घेतली. या सुनावणीदरम्यान सर्व कागदपत्रांचे आणि पुराव्यांचे निरीक्षण नोंदवून हा अंतिम निष्कर्ष काढण्यात आला आहे. शिक्षण उपसंचालकांच्या आदेशानुसार, सदर संस्थेने कोणतीही रितसर भरती प्रक्रिया न राबविता सन २०१८-१९ नंतर पूर्वलक्षी प्रभाबाने (बॅक डेटेड) म्हणजेच सन २०१० ते २०१२ या कालावधीत या नियुक्त्या झाल्याचे भासवले. प्रत्यक्षात हे शिक्षक कार्यरत नसतानाही शासनाची आणि न्यायालयाची दिशाभूल करून अनुदान लाटण्याच्या उद्देशाने खोटे पुरावे तयार करण्यात आले. या माध्यमातून महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावलीतील तरतुदींचा उघडपणे भंग करून शासनाची मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आदेशात म्हटले आहे.

या कागदपत्रांच्या आधारे तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, अनिल कांबळी यांनी या २० शिक्षकांना वैयक्तिक मान्यता प्रदान केल्या होत्या. शिक्षण उपसंचालकांनी आपल्या अधिकारांचा वापर करत या सर्व मान्यता ७ मे २०२६ च्या आदेशान्वये रद्द केल्या आहेत. त्याचप्रमाणे तत्कालीन शिक्षणाधिकारी अनिल कांबळी यांच्यावर शिस्तभंगविषयक कारवाई करण्याचा निर्णय दिला आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!