🛑“भरघोस व्याजाच्या आमिषाने हजारोंचा गंडा ?”
*🛑“भरघोस व्याजाच्या आमिषाने हजारोंचा गंडा ?”
*🛑बेळगावच्या ‘शिवम असोसिएट्स’ चौकशीचे लोण सावंतवाडी-दोडामार्गपर्यंत;*
*🛑गुंतवणूकदार हादरले, एजंट भूमिगत असल्याची चर्चा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १८:-* बेळगाव येथील बहुचर्चित ‘शिवम असोसिएट्स’ या आर्थिक संस्थेची सीआयडीकडून चौकशी सुरू झाल्यानंतर सावंतवाडी, दोडामार्गसह सीमाभागात एकच खळबळ उडाली आहे. भरघोस व्याजदर, अल्पावधीत दुप्पट परतावा आणि मोठ्या नफ्याच्या आमिषाला बळी पडलेल्या अनेक गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले असून “आपले पैसे सुरक्षित आहेत का?” हा प्रश्न आता प्रत्येक ठेवीदाराला सतावत आहे.
*“मोठ्या लोकांनीच नेले होते विश्वासात…”*
या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या संस्थेशी संपर्कात आलेल्यांमध्ये काही माजी सैनिक, प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर, कर्मचारी तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींचाही समावेश असल्याची चर्चा आहे. “मोठ्या लोकांनी गुंतवणूक केली आहे” या विश्वासावर अनेक सामान्य नागरिकांनी आयुष्याची पुंजी या संस्थेत टाकल्याचे बोलले जात आहे.
शिवानंद नीलणावरच्या अटकेनंतर खळबळ
‘शिवम असोसिएट्स’चा प्रमुख सूत्रधार मानला जाणारा शिवानंद सिद्धाप्पा नीलणावर याच्याविरोधातील कारवाई आणि त्याच्या अटकेची माहिती समोर आल्यानंतर सीमाभागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बेळगाव प्रशासन आणि पोलिसांनी आर्थिक व्यवहारांची पोलखोल सुरू केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
*“कस्टमर नेणारे” गायब ?*
सावंतवाडी व दोडामार्ग परिसरातून गुंतवणूकदारांना बेळगावपर्यंत घेऊन जाणारे, बैठका घडवून आणणारे आणि “ही योजना शंभर टक्के सुरक्षित” असल्याचे सांगणारे काही जण सध्या संपर्काबाहेर असल्याची जोरदार चर्चा आहे. काहींनी मोबाईल बंद केल्याचे, तर काही जण गावातही दिसत नसल्याचे बोलले जात आहे.
*सीआयडीच्या रडारवर सीमाभाग ?*
बेळगावमध्ये सुरू असलेल्या चौकशीचे धागेदोरे आता सीमाभागापर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दोडामार्ग आणि सावंतवाडीतील काही व्यक्तींच्या आर्थिक व्यवहारांची माहिती तपास यंत्रणांकडून घेतली जात असल्याची चर्चा रंगली आहे. “लवकरच काही घरांवर छापे पडू शकतात” या चर्चेमुळे अनेकांच्या झोपेचे खोबरे उडाले आहे.
“पोलीस कर्मचाऱ्यांच्याही गुंतवणुकीची चर्चा”
या प्रकरणात काही पोलीस कर्मचाऱ्यांनीदेखील लाखो रुपयांची गुंतवणूक केल्याची चर्चा सध्या दबक्या आवाजात सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आणि भीती दोन्ही वाढत आहेत.
*कर्नाटक पोलिसांचे पथक सावंतवाडीत ?*
शिवम प्रकरणातील चौकशी तीव्र होत असताना कर्नाटक पोलिसांचे एक पथक सावंतवाडी शहरात दाखल झाल्याचीही जोरदार चर्चा आहे. शिवमशी थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध असलेल्या काही व्यक्तींवर पोलिसांची करडी नजर असल्याचे बोलले जात असून यामुळे शहरात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
*“मोठ्या व्याजाच्या मोहात… आयुष्याची कमाई धोक्यात ?”*
अल्पावधीत जादा नफा मिळवण्याच्या हव्यासातून अनेक नागरिक अशा योजनांना बळी पडतात. “दरमहा भरघोस व्याज”, “शंभर टक्के सुरक्षित गुंतवणूक”, “मोठे अधिकारीही सहभागी” अशा गोंडस शब्दांच्या जाळ्यात अडकून अनेकांनी कोट्यवधी रुपये गुंतवल्याची चर्चा आहे. आता मात्र चौकशीच्या वादळाने या सर्व व्यवहारांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
*बेडक रोखठोक*
“व्याजाचा मोह आणि विश्वासाचा गैरफायदा…
शिवमच्या चमकदार आश्वासनांमागे आता भीतीचे सावट !
पैसा दुप्पट करण्याच्या नादात अनेकांची झोप उडाली;
आता चौकशीचा फास नेमका कुणाच्या गळ्यापर्यंत जाणार ?”
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
श
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

