कोकणमनोरंजनमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾ कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या पेट डॉग शो मध्ये सावंतवाडीतील म्हापसेकर यांच्या रॅटव्हीलर जातीच्या फीमेल डॉग ने पटकावला प्रथम क्रमांक

🖥 Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश मोरजकर

🎴सावंतवाडी, दि-०८:-  कोल्हापुर श्वान प्रेमींनी कोल्हापूर येथे 7 मार्च रोजी आयोजित केलेल्या “पेट डॉग शो” मध्ये सावंतवाडीचा युवक धीरेंद्र म्हापसेकर यांच्या रॉटव्हिलर या जातीच्या फीमेल डॉग ने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याला गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.

या स्पर्धेमध्ये 150 स्पर्धक(श्वान) सहभागी झाले होते. ही स्पर्धा कोल्हापूर मधील श्री गणेश लॉन राम कृष्ण हॉल मार्केट यार्ड येथे पार पडली. या स्पर्धेमध्ये विविध शहरातून मोठ्या प्रमाणावर विविध जातीचे श्वान सहभागी झाले होते. रॉटव्हिलर जातीच्या 15 श्वानांच्या ग्रुप मधुन श्री म्हापसेकर यांच्या श्वानाने पहिल्या राऊंडमध्ये पहिले पारितोषिक (प्रथम क्रमांक) मिळविला. ह्या श्वानाला मंदार गडाळे यांनी ट्रेनिंग दिले. त्यासाठी श्वान मालक व ट्रेनर यांचे कौतुक होत आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळुन ही स्पर्धा पार पडली. मास्क नाही तर प्रवेश नाही अशी महत्त्वाची अट या स्पर्धेला घालण्यात आली होती. परीक्षक म्हणून महेश कोरी, स्टीव अल्मेडा यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!