◾ राष्ट्रवादी काँग्रेसने केला महिला दिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ महिलांचा सत्कार..
◾ महिला दिनाचे औचित्य साधून केली महिलांची जिल्हा कार्यकारिणी जाहीर..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी दि.०८-: सावंतवाडी राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे आज जागतिक महिला दिनानिमित्त ज्येष्ठ महिलाचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी कोरोनाचे नियम व सोशल डिस्टन्सच पालन करून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हा कार्यकारणी जाहिर करण्यात आली आहे. यामध्ये रेवती संदेश राणे यांची अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर सुहासिनी सुभाष सावंत यांची उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. रंजीता राजेश पाताडे यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर सदस्य म्हणून रेखा कदम, अफरोज राजगुरू, वैशाली प्रभू, रमिजान बटवाले, गार्गी कुलकर्णी, रेजिना डिसोजा, श्रद्धा गावकर, नम्रता बोंगाळे , योगिता गोपाळ परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर विशेष निमंत्रित कार्यकारणी सदस्य पदी नम्रता कुबल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी राष्ट्रवादी नेते तथा कणकवली नगरसेवक आबिद नाईक, जिल्हा उपाध्यक्ष उदय भोसले, माजी शहर अध्यक्ष सत्यजित धारणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

