कर्दे ग्रामपंचायतीला ग्रामस्वच्छता अभियानात ५० हजाराचा पुरस्कार
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळुण : दि. ०८ संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत सन २०१८-१९ या वर्षी जिल्हा परिषद गट हर्णै मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल दापोली तालुक्यातील ग्रामपंचायत कर्दे गावाला ५० हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेअंतर्गत रुपये ५० हजार पारितोषिक मिळाले.
अलीकडेच काही दिवसांपूर्वी हा पारितोषिक वितरण सोहळा सोहळा जि. प. अध्यक्ष रोहन बने, जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, अण्णा कदम यांच्या उपस्थितीत पार पडला. कर्दे गावचे सरपंच सचिन तोडणकर व सदस्यांनी हा पुरस्कार इंदुराणी जाखड यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.
यावेळी उपसरपंच दत्ताराम भुवड, ग्रामसेवक गोरख पवार, पाणी कर्मचारी सदानंद रेवाळे आदी उपस्थित होते.
सरपंच सचिन तोडणकर हे अभ्यासु सरपंच म्हणून ओळखले जातात. गावात स्वछता अभियान व विविध लोकसहभागातुन योजना, उपक्रम त्यांनी राबविले आहेत.
कर्दे गाव परिस हा तालुक्यातील पर्यटनासाठी हॉट स्पॉट म्हणुन ओळखला जातो. स्वच्छता अभियान पुरस्कार मिळाल्याबद्दल परिसरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻
http://kokanlivebreaking.live
🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻
https://t.me/kokanlive
🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻
https://twitter.com/livekokan
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

