◼️संपूर्ण जिल्ह्यात मानाचा समजला जाणारा बाजार बॉईज कुडाळ चषकात “श्री विठ्ठल स्पोर्ट म्हापण” ठरला महाअंतिंम विजेता…*आकर्षक चषक आणि दिमाखदार, नेत्रदीपक, शिस्तबद्ध आयोजनासाठी
*◼️कै. देवेंद्र पडतेच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी यावर्षी “कै. देवेंद्रस्मृति चषक” असे करण्यात आले स्पर्धेचे नामकरण…*
*🖥️Kokan Live Breaking News*
*✍️प्रतिनिधी : समीर चव्हाण*
*🎴वेंगुर्ला : दि. ०८* आकर्षक भव्य दिव्य चषक आणि दिमाखदार शिस्तबद्ध आयोजनासाठी प्रसिद्ध असलेल्या बाजार बॉईज कुडाळ चषक स्पर्धेत असंख्य क्रीडा रशिकांच्या उपस्थितीत “विठ्ठल स्पोर्ट म्हापण” संघ ठरला महाअंतिम विजेता. दिनांक ५ मार्च २०२१ ते ७ मार्च २०२१ या कालावधीत कोरोणाचे नियम पाळत कुडाळ नगरपंचायतीच्या पटांगणात हि स्पर्धा पार पडली. ओंकार स्पोर्ट कुडाळ संघावर अंतिम सामन्यात मात करत विठ्ठल स्पोर्ट म्हापण संघाने घातली जेतेपदाला गवसणी. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीन्ही क्षेत्रात सांघीक खेळ साकारत म्हापण संघाने संपूर्ण स्पर्धेत गाजवले वर्चस्व.
या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज आणि क्षेत्ररक्षक म्हणून विठ्ठल स्पोर्ट म्हापण संघाचा खेळाडू गोट्या कांबळी याची निवड करण्यात आली तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून म्हापण संघाचा गोलंदाज विशाल चव्हाण यांची निवड करण्यात आली. अंतिम सामन्याचा सामनावीर ठरला म्हापण संघाचा कर्णधार ललित वायंगणकर. त्याने संपूर्ण स्पर्धेत कर्णधाराला साजेसा खेळ केला तर मालिकावीराचा बहुमान ओंकार स्पोर्ट कुडाळ संघाचा खेळाडू तेजस लुडबे याला प्राप्त झाला.
आकाश नार्वेकर, स्वप्निल तळावडेकर, अनंत नार्वेकर, निलेश मुंडये हे सर्व विठ्ठल स्पोर्ट म्हापण संघाचे संघमालक विजया नंतर जल्लोष करताना दिसून आले. बॉक्स टाईप क्रिकेट स्पर्धेत बाजार बॉईज कुडाळ चषक हा मानाचा चषक मानला जातो संपूर्ण जिल्हाच लक्ष या स्पर्धेवर लागलेलं असतं त्यामूळे या स्पर्धेच विजेतेपद मिळविने खूप खास असतं. त्यामूळे या विजयाचं महत्त्व संहमालक आणि खेळाडूंसाठी अणन्यंसाधरण आहे.
कै. देवेंद्र पडते याचा अकाली झालेला मृत्यू संपूर्ण कुडाळ शहरालाच शोकसागरात बूडवून गेला देवेंद्र हा कुडाळ शहरातील गुणी खेळाडू सुध्दा होता त्यामुळे त्याच्या स्मृतीप्रीत्यार्थ यावर्षी या चषकाला “कै. देवेंद्र स्मृतिचषक” असे नामकरण करण्यात आले व या स्पर्धेनिमीत्त त्याच्या पवित्र स्मृतींना उजाळा देत त्याला श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली, शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पडते, माझी उपनगराध्यक्ष आबा धडाम यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा पार पडला. समालोचक म्हणून बादल चौधरी, सुनील कराडकर व शेखर दळवी यांनी काम पाहिले.
आयोजकांच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.
_*🔥चुलीत भाजलेल्या काजु bbगरांची चवच न्यारी!🔥*_
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
*🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️*
_*🥏9405184052 🪀*_
_*🥏9421544545 🪀*_
_*📤..फोन न लागल्यास मेसेज करा!*_
_*🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

