कृषिकोकणसावंतवाडीसिंधुदुर्ग

राजकीय अनास्थेच्या पोटी काजु बागायतदार चिंतेत…

◼️काजु – बोंडे प्रक्रिया उद्योग नसल्याने, बोंडे कवडीमोल भावाने गोव्यात

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी : दि. ०७ राजकीय अनास्थेमुळे काजू बोंडे प्रक्रिया उद्योग रखडले असून काजू बोंडे गोवा राज्यात नेऊन त्यावर प्रक्रिया केली जात आहे. यामुळे काजू बागायतदारांचे प्रचंड नुकसान होत असल्याची चर्चा आहे.

काजू बागायतदार वर्षभर काजू शेतीची मशागत करतात आणि दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये ते पीक घेतात. काजू बी पासून काजूगर, टरफलापासून आॅईल आणि काजू बोंडू पासून मद्य निर्मिती प्रकल्प निर्माण करण्यासाठी सावंतवाडी तालुक्यात दोन सहकारी तत्त्वावर प्रकल्प नोंदणी करण्यात आले होते. मात्र या प्रकल्प संस्थाना शासन दरबारी योग्य ती सहकार्याची भूमिका मिळाली नसल्याने दोडामार्ग आणि आरोंदा येथील काजू उत्पादक सहकारी संस्था अडचणीत आल्या आहेत.

या हंगामात काजू बागायतदार काजू बी आणि बोंडे मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात असूनही या दोन्हीवर अपेक्षित प्रक्रिया उद्योग नाहीत. काजू बीवर छोटे-छोटे प्रक्रिया उद्योग असले तरी मोठ्या प्रमाणात काजू बी ही दलालांच्या घशात घातली जाते त्यामुळे शेतकऱ्यांना नाममात्र दर मिळतो. काजू बी आणि बोंडू यावर प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातच निर्माण झाले तर काजू बागायतदार आर्थिक अडचणीत सापडणार नाहीत असे असतानाही राजकीय अनास्थेमुळे शासन दरबारी शेतकर्‍यांचे काही चालेनासे झाले आहे.

गोवा आणि केरळ राज्याने काजू बागायतदार शेतकऱ्यांना काजू बी ला हमीभाव दिला आहे. केरळ राज्याचे काजू  बोर्डाची कार्यालय सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झाली आहेत मात्र महाराष्ट्रात काजू ला हमीभाव नाही आणि मागणी असूनही काजू बोर्ड निर्माण झालेले नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात काजू बोंडा वर प्रक्रिया उद्योग नसल्याने ही बोंडे गोवा राज्यात निर्यात केला जातात. या बोंडाना एक डबा मागे १३ रुपये तर दोडामार्ग भागांमध्ये किलोमागे २० किंवा २५ पैसे दर मिळतो. गोवा राज्यातील काजू फेणी किंवा  काजू मद्य निर्मिती प्रकल्प धारक कारखानदार दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील काजू बागायती मधून ही बोंडे प्रक्रियेसाठी घेऊन जातात. या काजू बोंडापासून मद्यार्क निर्माण करतात.

गोवा राज्यात महागड्या मद्यार्क निर्मितीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू बोंडे फायदेशीर ठरत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय अनास्था शेतकऱ्यांच्या मुळावर येत आहे. फक्त श्रेयासाठी राजकारण तापले जाते, पण शेतकरी बागायतदार मात्र चिंताग्रस्त बनले आहेत.

या हंगामात गोवा राज्यात काजूबोंडाना मोठ्या प्रमाणात मागणी आहे मात्र महाराष्ट्र राज्यातील काजू बी आणि बोंडू यावर हमीभाव नाही किंवा उत्पादन खर्चापेक्षा जास्त पैसे मिळविण्याचे साधन नसल्याने काजू शेती किफायतशीर असूनही ती शेतकऱ्यांना आर्थिक चणचण भासवणारी ठरत आहे.

या हंगामात पर्यावरणातील बदल व अवकाळी पावसाने  काजू बागायतदारांच्या  अडचणीत आणखीनच भर पडली आहे. काजू प्रक्रिया उद्योग जिल्ह्यात निर्माण करण्यासाठी राजकीय आशीर्वादाची गरज आहे. मात्र राजकीय अनास्थेमुळे काजू बोंडा वर प्रक्रिया होत नाहीत. कोकण कृषी विद्यापीठाने काजू बोंडा वर प्रक्रिया करणारी छोटी छोटी यंत्रे तयार केली आहेत मात्र त्यावर आधारित शासनाच्या सबसिडी सह उत्पादन आणि मार्केटिंग बाबत योजना नसल्यामुळे काजू बोंडे गोव्यातील कारखानदारांच्या  दरानुसार  विकावी लागत आहेत असे काजू बागायतदार शेतकरी बोलताना सांगतात.

राजकीय अनास्थेच्या पोटी शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत मात्र शासन आणि राज्यकर्त्यांनी काजू बागायतदारांसाठी योग्य निर्णय घेण्याबाबत मागणी होत आहे.

पालकमंत्री उदय सामंत यांनी काजू बी आणि बोंडू यावर योग्य दराचा उपाय शोधण्यासाठी बागायतदार शेतकऱ्यांशी संवाद साधला पाहिजे अशी मागणी केली आहे.

🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.

🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕

🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵

थंड पेये-🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤

🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲

🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!