इसापूर गावातून डंपर चालक विठ्ठल रामा शेळके गेले ५ दिवपासून बेपत्ता
🖥 Kokan Live Braking News
प्रतिनिधी : चौंडू पाटील
🎴आंबोली,दि-०७:- सावंतवाडी तालुक्याच्या सीमेला लागून असलेल्या इसापूर गावात धरणाच्या कामावर डंपर चालक म्हणून कार्यरत असलेले विठ्ठल रामा शेळके हे गेले पाच दिवसांपासून बेपत्ता आहेत
विठ्ठल रामा शेळके हे मुळ राहणारा थिवी गोवा येथील आहेत, २मार्च २१ रोजी हे इसापूर येथील कामावरून बेपत्ता असल्याची खबर तेथे कामावर कार्यरत असलेल्या थीवी गोवा येथील एका डंपर चालकाने मोबाईल द्वारे विठ्ठल शेळके यांच्या घरी दीली आज तीन दिवस झाले तरी तो आढळून आला नाही.
विठ्ठल चे भाऊ मामा वन्य नात्यातील लोक त्यांच्या शोध मोहिमेत सामील झाले आहेत विठ्ठल रामा शेळके अध्याप सापडलेले नाहीत कुणाला कुठे आढळून आल्यास कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज या चॅनल आंबोली प्रतिनिधी चौंडू पाटील मो.८००७६५५४८२ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

