◾ तत्कालीन उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची चौकशीची मागणी करणार ;आमदार दिपक केसरकर
◾ सावंतवाडी शहरात जो विकास दिसतो तो निधी मी आणला असे समाधान चव्हाण यांनी फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये;चांदा ते बांदा योजना बंद झाल्याची खंत आजही;आमदार केसरकर
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी, दि-०७:- मी पालकमंत्री असताना आणलेल्या निधीचा तत्कालीन उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी योग्यरीत्या वापर केला नाही, मनमानी कारभार केला, असा अधिकारी जर कुठे लाभला तर त्या जिल्ह्याचा विकास होणार नाही त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व कामांची चौकशी होण्याची मागणी आपण करणार असल्याची माहिती माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
रानटी प्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीबाबत आपण भरीव निधीची तरतूद केली होती ,मात्र ज्या भागात सौर उर्जेवर ची कंपाऊंड बांधली गेली त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याचा काही फायदा झाला नाही ,तो निधी वाया गेला असा बराचसा निधी समाधान चव्हाण यांच्या चुकीच्या नियोजनामुळे फुकट गेला आहे, त्यामुळे समाधान चव्हाण यांच्या कारकीर्दीत झालेल्या सर्व कामांची आपण चौकशीची मागणी करणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले .
मी नगराध्यक्ष असताना सावंतवाडी शहराचा कायापालट केला, व आमदार मंत्री झाल्यावर या शहरासाठी भरीव निधीची तरतूद केली, हे सर्व जनतेवरील प्रेमापोटी केले, त्यामागे कोणतेही राजकारण नव्हते ,मात्र सध्याची मंडळी राजकारण करून त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याचा विचार जनतेने करावा ,मी दिलेल्या कोणत्याही उमेदवाराच्या पाठीशी जनतेने ठाम उभे राहावे असे आवाहन आमदार केसरकर यांनी यावेळी बोलताना केले.
चांदा ते बांदा योजना अतिशय चांगली योजना होती, अनेक जण या योजनेचे कौतुक करतात ,या योजनेमुळे शेतकरी खरोखरच यांत्रिकीकरण शेतीकडे वळला त्याचे फायदे दिसायला लागले हे घडत असताना ही योजना बंद केली गेली त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले याची खंत आपल्याला आहे असे यावेळी बोलताना केसरकर म्हणाले .
यावेळी जिल्हा अध्यक्ष सतीश सावंत सदस्य व्हिक्टर डान्टस,अशोक दळवी, आदी उपस्थित होते.

